हैदराबाद : तेलंगानात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण रेल्वे मार्ग वाहून गेला आहे. वारंगल लगत असलेल्या के समुद्रम जवळ अतिवृष्टीने नदी नाल्यांना पूर आला. त्यामुळे रेल्वे रुळा खाली असलेली माती आणि गिट्टी वाहून गेली. तर रेल्वे रूळ लगत असलेले वीजेचे खांब वाकले. या घटनेनंतर या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.