यवतमाळमध्ये शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पुस नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत होते. या पाण्यातून एका तरुणाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. अर्धा पूल ओलांडल्यानंतर काही अंतरावर पाण्याच्या प्रवाहात तरुण वाहुन गेला. याठिकाणी नागरिकांनी व्हिडीओचे चित्रिकरण केलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रशासनाकडून वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेतला जात आहे. (भास्कर मेहरे, प्रतिनिधी)