
वर्धा: आपल्याकडे एखादा कार्यक्रम, विवाह सोहळा यांच्या निमंत्रण पत्रिका खूप आकर्षक बनवल्या जातात. पण नंतर या पत्रिका कचऱ्यातच जातात. पण याच पत्रिकांच्या पुठ्ठ्यापासून खास वस्तू बनवून आपलं घर सजवता येऊ शकतं. वर्धा येथील कलाकार निखिल सुशीला मोरेश्वर यांनी याच पत्रिकांच्या पुठ्ठ्यापासून आकर्षक फ्लॉवर पॉट कसा बनवायचा? हे दाखवलं आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची ही कल्पना आपल्यालाही नक्कीच आवडेल.