TRENDING:

Myanmar Earthquake: भूकंपातील मृतांचा भीतीदायक आकडा समोर; अधिकृत मृत्यू 1 हजाराच्या पुढे, अजून ढिगाऱ्याखाली...

Last Updated:

म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे 1002 जणांचा मृत्यू झाला असून 2376 जखमी आहेत. थायलंडमध्येही हादरे जाणवले तेथे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान म्यानमारच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतकार्य सुरू झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बँकॉक: म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपामुळे मृतांची संख्या 1000 च्या पुढे गेली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखालून अजूनही मृतदेह सापडत असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

म्यानमारच्या सैन्य नेतृत्वाखालील सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, या भूकंपामुळे आतापर्यंत 1002 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2376 जण जखमी झाले आहेत. तसेच 30 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून संपूर्ण अहवाल अद्याप संकलित केला जात आहे.

म्यानमार भूकंप; 1300KM दूर बँकॉकमध्ये हाहाकार, 300KM लांब भारत कसा वाचला?

advertisement

भूकंपाचे केंद्र म्यानमारच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहर मांडलेच्या जवळ होते. या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या आधीच गृहयुद्धाने त्रस्त असलेल्या म्यानमारमध्ये आता आणखी एका मानवीय संकटाची भर पडली आहे.

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या, रस्ते तुटले, पूल उद्ध्वस्त झाले आणि एक धरणही फुटल्याचे वृत्त आहे. यामुळे संपूर्ण देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

advertisement

तेव्हा पृथ्वी १० मिनिटे हादरली, जगाच्या इतिहासातील महाभूकंप

थायलंडमध्येही भूकंपाचे हादरे

म्यानमारचा शेजारील देश थायलंडमध्येही भूकंपाचे तीव्र हादरे जाणवले. राजधानी बँकॉकसह इतर भागांमध्ये मोठा धक्का बसला. बँकॉक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, थायलंडमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून, 26 जण जखमी आहेत आणि 47 लोक बेपत्ता आहेत.

बँकॉकमधील चतुचक बाजाराजवळील एका बांधकाम स्थळी मोठे नुकसान झाले. भूकंपाच्या धक्क्याने एक चीनी कंपनी बांधत असलेली 33 मजली इमारत खाली कोसळली. यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आणि बचावकार्य कठीण बनले.

advertisement

भूकंप येण्याआधी आकाशात दिसतात Earthquake Lights,शास्त्रज्ञही हैराण

बचावकार्य आणि आंतरराष्ट्रीय मदत

-या आपत्तीनंतर बचाव कार्यासाठी अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

-भारताने बचाव आणि वैद्यकीय पथकांसह तातडीची मदत पाठवली आहे.

-चीनने युन्नान प्रांतातून 37 सदस्यीय बचाव पथक ड्रोन आणि इतर उपकरणांसह यांगूनमध्ये पाठवले आहे.

-रशियाने आपत्कालीन मंत्रालयाच्या माध्यमातून 120 बचावकर्मचाऱ्यांसह दोन विमानांतून मदत पाठवली आहे.

advertisement

-संयुक्त राष्ट्रांनी भूकंपग्रस्तांसाठी 50 लाख डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

-भूकंपानंतर रक्ताचा तुटवडा जाणवत असून प्रशासनाने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सांगितले आहे. बचावकार्य वेगाने सुरू असून लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मराठी बातम्या/विदेश/
Myanmar Earthquake: भूकंपातील मृतांचा भीतीदायक आकडा समोर; अधिकृत मृत्यू 1 हजाराच्या पुढे, अजून ढिगाऱ्याखाली...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल