TRENDING:

रेल्वे प्लॅटफॉर्मवर रात्री बसल्या होत्या 2 मुली, गार्डची पडली नजर; त्यानं केलं असं काही की, कराल सॅल्युट

Last Updated:

दोन मुली स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर शांतपणे बसल्या होत्या. दोघीही घाबरल्या होत्या, कुणाशीच बोलत नव्हत्या. मालगाडीचा गार्ड आपल्या ड्युटीसाठी जात असताना त्याचं लक्ष या मुलींकडे गेलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : तारीख 3 ऑगस्ट, रात्रीचे 11 वाजले होते... 2 मुली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील बाकावर बसले होते. त्या घाबरलेल्या होत्या. एका गार्डची नजर त्या मुलींवर पडली. तो त्या मुलींजवळ गेला. त्याने त्या मुलींची विचारणा केली. त्यानंतर गार्डनं मुलींसोबत असं काही केलं की प्रत्येक जण त्याचं कौतुक करत आहे. तुम्हालाही त्याचं कृत्य समजलं तर तुम्हीसुद्धा सॅल्युट कराल.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

उत्तर प्रदेश प्रदेशातील ही घटना आहे.  हाथरस येथील दोन मुली ट्रेनमध्ये चढल्या. त्यांच्या शहरापासून 140 किलोमीटर अंतरावर असलेल्या इटावाला त्या पोहोचल्या. त्याच रात्री मालगाडीचा गार्ड रवनीत आर्यची इटावा स्टेशनवर ड्युटी होती. ड्युटीसाठी जात असताना इटावा रेल्वे स्टेशनच्या प्लॅसटवर त्याला दोन मुली घाबरलेल्या अवस्थेत बसलेल्या दिसल्या.

मध्यरात्री 3 वाजता रेल्वे स्टेशनवर होते 2 तरुण; GRP ने तपास करताच समजलं ते शॉकिंग

advertisement

कोण होत्या त्या मुली?

रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितलं की, गार्ड आर्य त्या मुलींजवळ गेला आणि त्या मुलींची चौकशी केली. त्यांना काही मदत हवी का म्हणून विचारलं. एका मुलीनं सांगितलं की, ती हाथरसची रहिवाशी आहे. एका ट्युशन सेंटरमधून परतत असताना काही तरुण तिच्या मागे लागले. ती खूप घाबरली आणि हातरस स्टेशनवर पोहोचली. स्वतःला वाचवण्यासाठी ती ट्रेनमध्ये चढली आणि ट्रेन काही मिनिटांत तिथून निघाली.

advertisement

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींनी चालत्या ट्रेनमधून मोबाईल फोनद्वारे आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला, परंतु परिस्थिती कशी हाताळावी आणि त्यांना खाली उतरण्यास कुठे सांगावं हे कुटुंबातील सदस्यांनाही समजलं नाही.

एकटीच बसलेली तरुणी, GRPला संशय; तपासात समजलं ट्रेनमध्ये चढायला नाही, स्टेशनवर करायला आली होती घाणेरडं काम

गार्डनं मुलींसोबत काय केलं?

आणखी एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं की, 'ट्रेन छोट्या स्टेशनवर थांबली पण त्या मुली उतरल्या नाही. कारण काही प्रवाशांनी त्या मुलींना इटावा इथं उतरण्याचा सल्ला दिला, जे एक मोठं स्टेशन आहे आणि प्रवाशांची चांगली सोय आहे. इटावा जंक्शनवर उतरल्यानंतर त्या कोणाशीही बोलायला घाबरत होत्या. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर एका बाकावर पूर्णपणे शांत बसल्या होत्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

ट्रेन गार्डचं लक्ष या मुलींकडे गेलं. त्यानं त्यांना स्टेशन अधीक्षकांकडे नेलं. त्यांनी रेल्वे पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलायला सांगितलं. यानंतर या मुलींची त्यांच्या कुटुंबासोबत भेट घडवून आणली.

मराठी बातम्या/Viral/
रेल्वे प्लॅटफॉर्मवर रात्री बसल्या होत्या 2 मुली, गार्डची पडली नजर; त्यानं केलं असं काही की, कराल सॅल्युट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल