एक महिला तिच्या टेस्ट दरम्यान हॉस्पिटलमध्ये रडली, ज्याबदल्यात हॉस्पिटलने तिच्यासोबत धक्कादायक कृत्य केलं. खरंतर या हॉस्पिटलने तिच्या रडण्याचे देखील एक्ट्रा चार्ज केलं आणि महिलेच्या बिलात सर्व टेस्टसह तिच्या रडण्याचेही पैसे लावले. ज्याचे तिला साधारण 3 हजार रुपये एक्ट्रा भरावे लागले.
हा संपूर्ण प्रकार उघड झाला जेव्हा सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट करण्यात आलं.
advertisement
न्यू यॉर्क शहरातील YouTuber, Camille Johnson ने तिच्या सोशल मीडियावर बिलाचा फोटो शेअर करत आपल्या बहिणीसोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. यामध्ये टेस्ट व्यतिरिक्त डॉक्टरांनी महिलेच्या रडण्याचे बिलही बनवले आहे. ही गंमत करत नाही. तर खरं आहे, तिच्या रडण्याची फी $40 (अंदाजे रु. 3000) होती.
या पोस्टला 5 हजारांहून अधिक लाईक्स आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. कॅमिलीने या मुद्द्यावर आणखी दोन ट्विट शेअर केले आहेत. अमेरिकेतील आरोग्य व्यवस्था जनतेने असं विचित्र वागण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अशा घटना घडल्या आहेत.