बाबा वेंगा बल्गेरियात राहत होते. 1996 मध्ये त्यांचं निधन झालं. ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हते. परंतु त्याला भविष्य दिसतं असा दावा त्यांनी केला होता. त्यांनी केलेले बरेच अंदाज अचूक ठरले. जसजसं 2024 हे वर्ष संपत आलं आहे, तसतसं या वर्षाबद्दलचे त्यांचे अनेक अंदाज पुन्हा एकदा खरे ठरत आहेत. 2024 सालाबाबत तिने केलेल्या 3 भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगाची चौथी भविष्यवाणी पाहण्याआधी त्यांच्या कोणत्या तीन भविष्यवाणी खऱ्या ठरल्या ते पाहुया.
advertisement
आर्थिक संकट
बाबा वेंगा यांनी 2024 मध्ये जागतिक आर्थिक संकटाची भविष्यवाणी केली होती. भू-राजकीय शक्तींमध्ये होणारे बदल आणि वाढत्या कर्जामुळे आर्थिक स्थिती ढासळू शकते, असं त्यांनी सांगितलं होतं. आजच्या काळात त्यांचं भाकीत खरं ठरताना दिसत आहे. वाढती महागाई, टाळेबंदी आणि उच्च व्याजदर जागतिक अर्थव्यवस्थेला हादरवत आहेत.
Astrology: नवीन वर्ष 2025 या 5 राशींसाठी वरदान! बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी ठरल्यास धनवर्षाव
यूएसमध्ये मंदीची चर्चा सुरू असली तरी, नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च (NBER) ने 2020 पासून कोणतीही मंदी जाहीर केलेली नाही. असं असूनही अनेक आर्थिक निर्देशक चिंता निर्माण करत आहेत आणि बाबा वेंगा यांनी भाकीत केल्याप्रमाणे जागतिक आर्थिक अस्थिरतेची भीती व्यक्त केली जात आहे.
2024 हे सर्वात उष्ण वर्ष
बाबा वेंगा यांनी हवामान बदलाबाबत भाकीत केलं होतं, जे 2024 मध्ये खरं ठरत आहे. वाढतं तापमान आणि सतत बिघडणारं हवामान यामुळे जगाला हवामान संकटाच्या वास्तवाला सामोरं जावं लागलं आहे. वाढत्या तापमानाने जागतिक नेत्यांना आणि शास्त्रज्ञांना तातडीनं पावले उचलण्यास भाग पाडलं आहे.
कॅन्सरवर उपचार
बाबा वेंगा यांनी 2024 मध्ये वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रगतीचा अंदाज वर्तवला होता. रशियाने एक लस तयार केल्याचा दावा केला आहे, जी कॅन्सरच्या ट्यूमरवर उपचार करण्यास मदत करू शकते. नुकतंच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या उपचारात मोठं यश मिळालं आहे. दुसरीकडे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, इंटरलेस चाचणीत आढळून आलं की मानक उपचारापूर्वी केमोथेरपीचा एक छोटा कोर्स मृत्यूचा धोका 40% कमी करू शकतो. याशिवाय कर्करोगाच्या पुनरावृत्तीचा धोका देखील 35% कमी झाला. हा शोध कर्करोग उपचारातील सर्वात मोठी प्रगती मानली जात आहे.
VIDEO : सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय चड्डी लेडी; करते असं काही की पुरुषही वैतागले
चौथी भविष्यवाणी काय?
2024 मध्ये बलाढ्य देश जैविक अस्त्रांचा वापर करेल असं भाकीत त्यांनी केलं. असं कोणतंही प्रकरण अद्याप समोर आलं नसलं तरी युद्धाचे धोके आणि नवीन तंत्रज्ञान कायमच आहेत.