कंपनीचे संस्थापक कौशिक मुखर्जी यांनी सांगितले की, भाषिक मूर्खपणा (language nonsense) मुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. कन्नड न बोलणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना बेंगळूरुमधील सध्याच्या भाषिक वातावरणाचा बळी होऊ द्यायचे नाही, असे ते म्हणाले. हा स्थलांतराचा विचार त्यांच्या कर्मचाऱ्यांनीच मांडला होता आणि त्यांच्या चिंतांना मुखर्जी यांनी पाठिंबा दिला.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
advertisement
या घोषणेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही युझर्सनी पुण्यामध्येही अशाच समस्या येऊ शकतात, असा इशारा दिला आहे. पुण्यात तुमच्या कर्मचाऱ्यांना मराठी न बोलल्यास मनसेकडून मारहाण होण्याची शक्यता आहे, अशी टिप्पणी एका युझरने केली.
भारताच्या या शेजारी देशात एकही नदी नाही; तर दुसऱ्या शेजारी देशात 700 नद्या
काहींनी गांधीनगर किंवा नोएडासारख्या शहरांची शिफारस केली, जिथे भाषेची कोणालाही पर्वा नाही. अनेक युझर्सनी व्यंगात्मकपणे या निर्णयाचे कौतुक केले. हा एक चांगला निर्णय आहे. सुटका झाली. आमच्या प्रिय शहराला गर्दीमुक्त करण्यात मदत केल्याबद्दल धन्यवाद, असे एकाने म्हटले. तर दुसऱ्याने पुण्यात स्थलांतरित होत असताना तुमच्या अमराठी कर्मचाऱ्यांना मराठी शिकायला सांगा, असा सल्ला दिला.
ताज्या भाषिक वादाचे कारण
नुकताच बेंगळूरुमध्ये एका स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) व्यवस्थापकाने एका ग्राहकाशी कन्नडमध्ये बोलण्यास नकार दिल्यानंतर नवीन भाषिक वाद निर्माण झाला होता. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप उसळला. कारण त्यांनी या नकाराला प्रादेशिक भाषा आणि संस्कृतीचा अनादर मानले. सोशल मीडियावर हा मुद्दा लगेचच व्हायरल झाला आणि अनेकांनी राज्याच्या भाषिक संवेदनशीलतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या बँक अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
पाकचा नीचपणा, विमानाला Airspace नाकारली; पायलटच्या निर्णयाने 227 जण जीवंत परतले
बेंगळूरुसारख्या तंत्रज्ञान केंद्रात भाषिक विविधता ही सामान्य बाब आहे. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांच्या भाषिक स्वातंत्र्यासाठी घेतलेला हा निर्णय इतर कंपन्यांसाठी एक नवा आदर्श निर्माण करू शकतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
