TRENDING:

खणाच्या वस्तूंनी वाढवा सणांची रंगत, भांडूपमध्ये 100 रुपयांत मिळतील असंख्य ऑप्शन

Last Updated:

'खणा'च्या कापडाला फार जुनी परंपरा आहे. मराठमोळं आणि पारंपरिक कापड असलेला खण सणसुदीच्या सजावटीला एक खास सांस्कृतिक स्पर्श देतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आपल्याकडे श्रावणापासून अनेक सण-उत्सवांना सुरुवात होते. मंगळागौर झाल्यानंतर काही दिवसाच गौरी-गणपती देखील येतात. सणासुदीचा हंगाम जवळ आला की, घराघरात सजावटीची आणि भेटवस्तूंची तयारी सुरू होते. याच पार्श्वभूमीवर भांडूपमधील 'द स्यू सेन्सेशन्स' (The Sew Sensations) या वर्कशॉपमध्ये खणाच्या पारंपरिक आणि आकर्षक वस्तूंची खास विक्री सुरू झाली आहे.
advertisement

'खणा'च्या कापडाला फार जुनी परंपरा आहे. मराठमोळं आणि पारंपरिक कापड असलेला खण सणसुदीच्या सजावटीला एक खास सांस्कृतिक स्पर्श देतो. म्हणूनच 'द स्यू सेन्सेशन्स' या दुकानात उपलब्ध असलेल्या वस्तूंना सध्या खूप चांगली मागणी आहे. याठिकाणी तुम्हाला खणाचे आकर्षक तोरण, रंगीबेरंगी कंदील, गिफ्टिंगसाठी छोट्या-मोठ्या फ्रेम्स, ओवाळणीचे ताट अशा विविध वस्तू मिळतील. विशेष म्हणजे या वस्तूंची किंमत फक्त 100 रुपयांपासून सुरू होते.

advertisement

Ganpati Ornaments: मुकुट, कंठी, मोदक अन् बरंच काही, फक्त 30 रुपयांपासून ठाण्यात खरेदी करा बाप्पाचे दागिने

प्रत्येक सणाची गरज लक्षात घेऊन येथे वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. वस्तूंच्या किंमती व श्रेणीमध्ये भरपूर वैविध्य आहे. प्रिंटेड केळीची पानं 150 रुपयांना तर मोठी प्लेन पानं 250 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. खणाच्या आकर्षक स्लिंग बॅग्स 200 रुपयांमध्ये तर इतर बॅग्स 50 ते 200 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. खणाच्या पान-फुलांच्या तोरणांची रेंज 500 रुपयांपासून सुरू होते. याशिवाय, खणापासून तयार केलेल्या फॅब्रिक ज्वेलरीची किंमत 150 रुपयांपासून सुरू होते. खणाच्या छोट्या फ्रेम्स 150 रुपये आणि मोठ्या फ्रेम्स 400 रुपयांमध्ये मिळत आहेत. त्याचबरोबर खणाचे कमलाच्या आकाराचे आसन 500 रुपयांमध्ये विकले जात आहे.

advertisement

या दुकानातील काही वस्तू मंगळागौर आणि गौरी-गणपतीच्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात सुवासिनींना भेट म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. जर तुम्हाला या वस्तू ऑर्डर करायच्या असतील, तर 'The Sew Sensations' या नावाने त्यांचे इन्स्टाग्राम पेज आहे. तिथे थेट मेसेज करून ऑर्डर देता येईल. '9892432080' या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून देखील ऑर्डर नोंदवता येते.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
खणाच्या वस्तूंनी वाढवा सणांची रंगत, भांडूपमध्ये 100 रुपयांत मिळतील असंख्य ऑप्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल