पृथ्वीवर 195 पेक्षा जास्त देश आहेत. गेल्या काही शतकांच्या उलाढालीत काही मोठ्या देशांचं विभाजन होऊन त्यापासून नवे छोटे देश तयार झाले, तर काही छोटे-छोटे देश विलीन होऊन त्यापासून मोठे देश निर्माण झाले. या सर्वांमध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान देश कोणता? जाणून घ्या.
लहान देशांच्या तुलनेत मोठ्या देशांमध्ये भौगोलिक, हवामान आणि जैव विविधता अधिक असते, असं संशोधन सांगतं, पण क्षेत्रफळाने मोठा असलेला जगातला देश कोणता हे जाणून घेणं रंजक ठरेल.
advertisement
क्षेत्रफळाच्या दृष्टीनं रशिया हा जगातला सगळ्यात मोठा देश आहे. रशियाचं आधीचं नाव सोव्हिएत युनियन असं होतं. रशियाचं क्षेत्रफळ जगाच्या एक तृतीयांश क्षेत्रफळाइतकं आहे, असं म्हणायला हरकत नाही. उत्तर आशिया आणि पूर्व युरोपातल्या मोठ्या भागावर अजूनही रशियाचं नियंत्रण आहे.
आशिया खंडाला लागून असलेला रशिया हा युरोपीय महाद्वीपातला सगळ्यात मोठा देश आहे. याचं क्षेत्रफळ 17.098 मिलियन चौरस किलोमीटर आहे. ते पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या 11 टक्के आहे. जगातली महाशक्ती असलेल्या या देशात भरपूर नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. रशियाशी वैर घेण्याची हिंमत फार कमी देशांकडे आहे. रशियाने तेल आणि गॅसची निर्यात बंद केली, तर अनेक देशांमध्ये काळोख पसरेल. स्वयंपाक करणं अवघड होऊन जाईल. युरोपची गॅसची गरज बऱ्याच अंशी रशियाच पूर्ण करतो.
चीनप्रमाणेच रशियाची सीमाही 14 देशांशी जोडली गेलेली आहे. या देशाची लोकसंख्या अंदाजे 14 कोटी आहे. खनिज साधनसंपत्तीमध्ये रशिया समृद्ध आहे. मात्र त्यापैकी अजूनही बऱ्याच साधनसंपत्तीचा उपयोग करता येऊ शकत नाही. जवळपास वर्षभर होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे हा जगातल्या सर्वांत थंड देशांमध्ये मोडतो.
रिपोर्ट्सनुसार, कॅनडा हा जगातला दुसऱ्या क्रमांचा मोठा देश आहे. खूप कमी लोकांना हे माहीत आहे. उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेला असलेल्या या देशाचं क्षेत्रफळ 9.984 मिलियन चौरस किलोमीटर आहे. अमेरिकन महाद्वीपाच्या उत्तर भागाच्या 41 टक्के आणि पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या 6.7 टक्के भूभाग या देशाने व्यापला आहे.
क्षेत्रफळाच्या तुलनेत तिथली लोकसंख्या खूप कमी आहे. तिथे दर चौरस किलोमीटरच्या क्षेत्रफळात केवळ चार नागरिक राहतात. कॅनडाची एकूण लोकसंख्या 35 मिलियन म्हणजेच 3.5 कोटी आहे. देशाला 2,02,080 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. जगातल्या इतर कोणत्याही देशापेक्षा तो जास्त आहे.