मच्छराच्या चाव्यामुळे 14 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. हे प्रकरण युरोपमधून समोर आलं असून घटनेवं सर्वत्र खळबळ माजवली आहे. ही घटना चर्चेत येताच लोकांच्या मनात भितीचं वातावरण झालं आहे.
म्हातारपणी सुंदर दिसण्याची हौस, महिलेनं 'प्लास्टिक सर्जरी' करण्यासाठी विकलं घर
14 वर्षांचा मॅटेओ शिऊ त्याच्या पालकांसोबत युरोपमध्ये राहत होता. इटलीमध्ये त्यांचं घर होतं. तो सुट्टीसाठी त्याच्या आईसोबत ब्राझीलला गेला होता. आजीच्या घरी मॅटेओने कुटुंबासोबत चांगला वेळ घालवला. पण इथे त्याला डास चावला. तो सामान्य डासांपेक्षा वेगळा होता आणि मॅटेओला त्रास देऊ लागला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेचा धक्का बसला आहे कारण अशा अपघाताची कोणालाच अपेक्षा नव्हती.
advertisement
सिंह, बिबट्या, मगरी यांसारख्या प्राण्यांना आपण घाबरत असू, पण मानवी जीवनासाठी सर्वात घातक म्हणजे डास. याआधीही काही प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये डासांमुळे पसरणाऱ्या संसर्गामुळे लोकांचं आरोग्य बिघडलं. डास चावल्यामुळे वेगवेगळे आजार झाले याविषयी अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत.
VIDEO : फोनवर बोलताना व्यक्तीनं अचानक उंच इमारतीवरून उडी मारली, अंगावर काटा आणणारं दृश्य
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणताही ऋतू असो मच्छरांचा वावर कायमच असतो. डासांमुळे तुम्ही शांत बसू शकत का झोपू शकत नाही. ते सतत कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे गुनगुनत असतात. मग काय त्यांच्या चाव्यामुळे ते रक्त पितात आणि शरिराला खाज सुटते आणि कधी कधी हे आरोग्यासाठी धोकादायक ठरतं. यातून वेगवेगळे आजार बळावतात.
