VIDEO : फोनवर बोलताना व्यक्तीनं अचानक उंच इमारतीवरून उडी मारली, अंगावर काटा आणणारं दृश्य
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतात. अगदी क्षुल्लक कारणावरुन टोकाचं पाऊल उचलतात. अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे.
नवी दिल्ली, 03 ऑगस्ट : आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतात. अगदी क्षुल्लक कारणावरुन टोकाचं पाऊल उचलतात. अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अशा घटना खळबळ माजवताना दिसतात. एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका व्यक्तीनं उंच बिल्डिंगवरुन उडी घेतली. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती इमारतीच्या वर टेरेसवर उभा असलेला दिसक आहे. तो फोनवर बोलताना दिसतो. अचानक तो खाली उडी मारतो. खाली उडी मारल्यानंतर, तो छताला पकडण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला ते धरता येत नाही आणि तो पार्किंगमधील गाड्यावर थेट खाली पडतो. हे दृश्य पाहून अंगावर काटा उभा राहतो.
advertisement
@1000waystod1e नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 9 सेकंदांचा हा व्हिडीओ हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताच व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहेत. ही व्यक्ती उडी मारण्यापूर्वी फोनवर बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्यक्तीने इमारतीवरून ज्या पद्धतीने उडी मारली आहे, त्यामुळे या व्यक्तीच्या जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी आहे.
advertisement
— 1000 WAYS TO DIE (@1000waystod1e) July 31, 2023
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आत्महत्येचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अनेक घटनांमध्ये आजूबाजूचे लोक किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांचे प्राण वाचवले, तर अनेक घटनांमध्ये लोकांना जीव गमवावा लागला.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 03, 2023 11:12 AM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : फोनवर बोलताना व्यक्तीनं अचानक उंच इमारतीवरून उडी मारली, अंगावर काटा आणणारं दृश्य










