मिळालेल्या माहितीनुसार, मैनपुरीच्या करहल शहरातील एका तरुणाचं लग्न बसरेहर येथील एका गावातील तरुणीसोबत निश्चित झालं होतं. शनिवारी करहाळ येथील एका गेस्ट हाऊसमध्ये लग्नासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले होते. नववधू स्टेजवर पोहोचली आणि वरमाळेचा कार्यक्रम आनंदात संपला. दरम्यान, काही कारणावरून वधू-वरामध्ये वाद झाला. रागाने वधू तिच्या खोलीत गेली. वरही रागाने वधूच्या मागे तिच्या खोलीत गेला आणि पुन्हा एकदा दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की रागात नवरदेवाने नवरीला चापट मारली.
advertisement
यानंतर संतापलेल्या वधूने लग्नास नकार दिला. एवढंच नाही तर तिने तक्रार घेऊन पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत काढली आणि नंतर लग्न पार पडलं. करहलचे प्रभारी निरीक्षक ललित भाटी सांगतात की, लग्न समारंभात झालेल्या वादानंतर वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. चर्चेनंतर प्रकरण मिटलं. यानंतर हा विवाह झाला.
दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाल्यानंतर वधूने आपली तक्रार मागे घेतली आणि वराच्या घरी पोहोचली. वराच्या घरीच सात फेरे घेतले. फेरे घेतल्यानंतर वधू म्हणाली, 'आमच्यात काही वाद झाला. आता सर्व काही ठीक आहे.'' वराची आई म्हणाली, ''दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला होता. घरी येऊन सात फेरे घेतले आहेत. माझी सून घरी आल्याने मला खूप आनंद झाला आहे. लग्नामध्ये हे सर्व होतच असतं.'