शिवपुरी येथील अमोल येथे राहणाऱ्या एका कुटुंबानेही नवविवाहित वधूचं त्यांच्या घरी स्वागत करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. या कुटुंबाने वधूला लाखोंचे दागिने भेट म्हणून दिले होते. लग्नानंतर सकाळी वधूही सासरच्या घरात पोहोचली. मात्र तोपर्यंत वधूचा हेतू कोणालाच समजला नाही. संध्याकाळनंतर वधूला काय करायचं आहे, हे कोणालाही माहिती नव्हतं.
लग्नादिवशीच नवरीच्या रूममध्ये जाऊन नवरदेवाचं अजब कांड; तरुणीने लग्नास दिला नकार, मग...
advertisement
सकाळी वधूने सासरच्या घरी पोहोचून दिवसभर धार्मिक विधी केले. सर्वजण नववधूच्या स्वागतात व्यस्त होते. दरम्यान, सायंकाळी नवरीने शौचालयाला जात असल्याचं सांगितलं. घरात बाथरूम आणि टॉयलेट होतं. मात्र, लोकांना वाटलं की नववधूला तिच्या घरी बाहेर जाण्याचीच सवय असेल, त्यामुळे सगळ्यांनी तिला जाऊही दिलं. पण शौचाच्या बहाण्याने नववधू भलतंच कांड करणार आहे, हे त्यांना माहिती नव्हतं.
संध्याकाळी वधू शौचालयाला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडली. मात्र बराच वेळ होऊनही ती परतली नाही. त्यामुळे घरातील सदस्य काळजीत पडले. त्यांनी बाहेर जाऊन वधूचा शोध घेतला असता कुठेही तिचा पत्ता लागला नाही. त्यानंतर नवरी लग्नात दिलेले सर्व दागिने घेऊन पळून गेल्याची बातमी मिळाली. हे समजताच घरात एकच गोंधळ उडाला. इज्जत जाण्याच्या भीतीने वराने थेट सासरी जाऊन मुलीच्या धाकट्या बहिणीकडे लग्नाची मागणी घातली. मुलीच्या घरच्यांनी नवरदेवाकडे चार दिवसांचा अवधी मागितला आहे. यानंतर पुढे काय करायचं? हे ठरवलं जाईल.