TRENDING:

Nostradamus Predictions 2024: 'या' घटनांनी जगभरात हाहाकार उडणार? 2024 बद्दल नॉस्ट्रॅडॅमसची टेन्शन वाढवणारी भविष्यवाणी

Last Updated:

1555 मध्ये त्यांनी "लेस प्रोफेसीज" नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकात भविष्याचे वेध घेणारे तब्बल 942 अंदाज वर्तवण्यात आले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली 14 डिसेंबर : नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खूप प्रसिद्ध आहे. कारण तो 16 व्या शतकातील फ्रेंच ज्योतिषी म्हणून ओळखला जातो. 1555 मध्ये त्यांनी "लेस प्रोफेसीज" नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकात भविष्याचे वेध घेणारे तब्बल 942 अंदाज वर्तवण्यात आले होते. आता 2024 या वर्षासाठी त्यांचे अशुभ अंदाजही आहेत. त्यांच्या लेखनात अस्पष्टता असूनही हिटलरचा उदय, JFK ची हत्या, 9/11 आणि कोविड-19 महामारी यासारख्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचे भाकीत करण्याचे श्रेय नॉस्ट्रॅडॅमसला जाते.
नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी
नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी
advertisement

2024 साठीचे त्यांचे अंदाज लोकांना विचार करायला भाग पाडतात. येत्या वर्षात समुद्री संघर्ष, साम्राज्यवादी उलथापालथ, मानवीय संकटांसह जागतिक उलथापालथी देखील सूचित केल्या आहेत. यानुसार किंग चार्ल्स III च्या जागी प्रिन्स हॅरी सिंहासनावर आरूढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. आणखी एका भविष्यवाणीत चीनचे नाव देखील समाविष्ट आहे. यात युद्ध आणि नौदल युद्धाचा अंदाज दिला आहे, जे जवळजवळ तैवानशी तणावाशी संबंधित आहे.

advertisement

Interesting facts: सूर्यप्रकाश नेहमी पांढराच का दिसतो? यामागे आहे मनोरंजक वैज्ञानिक तथ्य

नॉस्ट्रॅडॅमसने दुष्काळ, जंगलातील आग आणि विक्रमी तापमानासह गंभीर हवामान आपत्तींचा अंदाज वर्तवला आहे. नॉस्ट्रॅडॅमसचे भाकीत एक्सट्रीम वेदर आणि जागतिक भूकमारीही सूचित करतात. त्यांच्या लिखाणातून पोपच्या पदामध्ये बदल सुचवण्यात आला आहे, वृद्ध पोपचा मृत्यू आणि नवीन रोमन पोपची निवड होण्याचा अंदाज आहे. हे पोप फ्रान्सिसच्या आरोग्य समस्यांशी संभाव्यपणे जोडलेले आहेत.

advertisement

जर आपण नॉस्ट्रॅडॅमसच्या भाकीतांच्या अचूकतेचा विचार केला तर, 2023 साठीची त्यांची भविष्यवाणी युक्रेनमधील युद्ध आणि गव्हाच्या वाढत्या किमतींशी संबंधित आहे. मात्र, नॉस्ट्राडेमसच्या अनेक गंभीर भविष्यवाण्या गेल्या काही वर्षांत खऱ्या ठरल्या नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी लिहिलेले सर्व काही बरोबर असेलच असे नाही. त्यामुळेच अनेक टीकाकारांनी त्यावर विश्वास न ठेवण्याचा आग्रह धरला.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Nostradamus Predictions 2024: 'या' घटनांनी जगभरात हाहाकार उडणार? 2024 बद्दल नॉस्ट्रॅडॅमसची टेन्शन वाढवणारी भविष्यवाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल