Interesting facts: सूर्यप्रकाश नेहमी पांढराच का दिसतो? यामागे आहे मनोरंजक वैज्ञानिक तथ्य

Last Updated:

सूर्यप्रकाशात अनेक रंग मिसळलेले असतात, म्हणूनच कधीकधी आपल्याला आकाशात इंद्रधनुष्याचा रंग दिसतो. परंतु सूर्यप्रकाशाचा रंग नेहमीच सारखाच असतो.

सूर्यप्रकाश पांढराच का ?
सूर्यप्रकाश पांढराच का ?
मुंबई 14 डिसेंबर : निसर्गात अनेक अशा अद्भूत गोष्टी आहेत, ज्या आपण रोज पाहतो. मात्र, हे असंच का याबाबतचा विचारही अनेकदा मनात येतो. निसर्गातील प्रत्येक नैसर्गिक घटनेमागे काहीतरी रंजक कारण असतं. यातीलच एक गोष्टी म्हणजे सूयप्रकाश. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्याचा रंग लाल असला तरी आपल्याला सूर्यप्रकाश नेहमी पांढराच दिसतो. असं का? कधी ना कधी हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल.
सूर्यप्रकाशात अनेक रंग मिसळलेले असतात, म्हणूनच कधीकधी आपल्याला आकाशात इंद्रधनुष्याचा रंग दिसतो. परंतु सूर्यप्रकाशाचा रंग नेहमीच सारखाच असतो. नक्की त्याचं मूळ कारण काय आहे? ते जाणून घेऊया. तसं तर, प्रायमरी रंगाचे दोनच प्रकार आहेत. एक म्हणजे जे प्रकाशाचे रंग आहेत, जसं की लाल-हिरवा आणि निळा आणि दुसरं म्हणजे जे रंगद्रव्ये म्हणजे पदार्थांचे रंग. आपण त्यांचा वापर पेंटिंगमध्ये करतो. जसं की लाल, निळा, पिवळा. जेव्हा रंगद्रव्यांवर प्रकाश पडतो तेव्हा ते सर्व रंग शोषून घेतात आणि केवळ त्या पदार्थाचा रंग प्रतिबिंबित करतात. उदाहरणार्थ, जेव्हा प्रकाश आकाशात पडतो तेव्हा तो सर्व रंग शोषून घेतो आणि फक्त निळा रंग प्रतिबिंबित करतो. म्हणूनच ते निळं दिसतं. याचा अर्थ असा की त्याने बाकी रंग लपवले.
advertisement
आता प्रकाशाच्या रंगाबद्दल बोलूया. ते जसं आहे तसं दिसतं. जर प्रकाश लाल रंगाचा असेल तर तो लाल दिसेल आणि जर तो हिरवा रंग असेल तर तो फक्त हिरवाच दिसेल. पण कोणतेही दोन रंग एकत्र आले तर ते मिसळतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही लाल आणि हिरवे रंग मिक्स केले तर ते पिवळे दिसेल. या रंगांमध्ये एकमेकांना जोडण्याचा गुण आहे. सूर्यप्रकाश आपल्याला पांढरा दिसतो कारण तो सर्व प्राथमिक रंगांचं मिश्रण आहे. म्हणजे सर्व प्राथमिक रंग त्यात विरघळतात. हे अशा प्रकारे समजून घ्या की जर तुम्हाला रंगद्रव्ये म्हणजेच पदार्थांचे रंग एकत्र करून पांढरे करायचे असतील तर ते शक्य नाही. कारण त्यांच्यात तो दर्जा नाही.
मराठी बातम्या/Viral/
Interesting facts: सूर्यप्रकाश नेहमी पांढराच का दिसतो? यामागे आहे मनोरंजक वैज्ञानिक तथ्य
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement