Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची रिलीज डेट ढकलली पुढे; 'या' दिवशी होणार प्रदर्शित

  • Published by:
Last Updated:

Punha Shivaji Raje Bhosale : महेश मांजरेकरांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

News18
News18
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) भारतीय मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. आजवर अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. 2009 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट चांगलाच गाजला. आजही या चित्रपटाचा तेवढाच बोलबाला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सीक्वेलची अर्थात 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची (Punha Shivaji Raje Bhosale) घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र दिनी महेश मांजरेकरांनी दिलेल्या या सुखद वार्ताने सिनेप्रेमी चांगलेच सुखावले. पण आता मात्र या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकल्याचं समोर आलं आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. "महाराष्ट्राचं आराध्य दैवत पुन्हा अवतरणार! 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या दिवाळीत साक्षी रहा इतिहासाच्या नव्या गजराला! जो मनात नवा स्वराज्याभिमान जागवणार आहे", असं म्हणत मांजरेकरांनी या चित्रपाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली होती. त्यामुळे या दिवाळीत बॉक्स ऑफिसवर फक्त 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या मराठी चित्रपटाचा दबदबा असणार होता.
advertisement
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' कधी प्रदर्शित होणार?
पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली असून आता हा बहुप्रतिक्षित चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटात मराठी मालिकाविश्वासह बॉलिवूड गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थने महाराजांची भूमिका साकरली आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटात बालकलाकार त्रिशा ठोसरदेखील केंद्रस्थानी असणार आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)



advertisement
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाची निर्मिती राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी केली आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. गणपतीत या चित्रपटातील 'दुर्गे दुर्घट भारी' या गाण्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. एकंदरीतच 2026 च्या सुरुवातीलाच महेश मांजरेकर चांगलाच धमाका करणार आहेत. महेश मांजरेकरांचा आगामी 'दशावतार' हा चित्रपट येत्या 12 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत दिलीप प्रभावळकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची रिलीज डेट ढकलली पुढे; 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement