संतापजनक! रक्ताच्या नात्याला काळिमा, पुण्यात नराधम बापाचा 14 वर्षांच्या लेकीवर 4 महिने अत्याचार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Pune: पुण्यातील कोंढवा परिसरात एका अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घडली आहे. इथं एका नराधम बापाने आपल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांनी पुणे शहर हादरले आहे. अलीकडेच नाना पेठेत एका तरुणावर गँगवॉरमधून गोळीबार करण्यात आला होता. ही घटना ताडी असताना आता कोंढवा परिसरात एका अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इथं एका नराधम बापाने आपल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी गेल्या चार महिन्यांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
ही संतापजनक घटना कोंढवा येथील काकडीवस्ती परिसरात घडली. एका नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती 'गनिमीकावा' संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. ही माहिती मिळताच, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ या नराधम बापाला पकडले. संतापलेल्या जमावाने त्याला चांगलाच चोप दिला आणि नंतर त्याला कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले.
advertisement
पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ गुन्हा दाखल केला. आरोपी पित्याविरोधात 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून तिचं समुपदेशन करण्यात आलं आहे.
पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. बापाने अशाप्रकारे बापलेकीच्या नात्याला कलंक फासल्याने खळबळ उडाली आहे. कोंढवा पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 11, 2025 1:42 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
संतापजनक! रक्ताच्या नात्याला काळिमा, पुण्यात नराधम बापाचा 14 वर्षांच्या लेकीवर 4 महिने अत्याचार