सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे चॅलेंज आहे, रंगांच्या नावाचं. ज्यात रंगांची नावं दिली आहेत, पण शब्दांना वेगळा रंग आहे. म्हणजे दिसताना रंग वेगळा आहे आणि नाव मात्र वेगळ्याच कलरचं आहे.
सामान्यपणे तुम्ही पाहिलं असेल एखादा रंग दाखवला की त्याच रंगाचं नाव असतं. जसं की हिरवा कलर असेल तर त्यावर हिरवा शब्द, लाल रंग असेल तर लाल असा शब्द. पण या व्हिडीओत मात्र पिवळा शब्द असेल तर त्याला निळा कलर, हिरवा शब्द असेल तर त्याला लाल रंग दिला आहे. ज्यामुळे वाचताना चांगलाच गोंधळ उडतो.
advertisement
Puzzle Quiz: 5 अक्षरांचा शब्द, आणखी अक्षरं जोडली की छोटा होतो, सांगू शकता तो कोणता?
म्हणजे आता रंग कोणताही असो तुम्ही वाचायला गेलात तर शब्दच वाचणार बरोबर ना! शब्दाचा रंग तर आपण वाचणार नाही. आता इथं हेच चॅलेंज आहे. तुम्हाला शब्द वाचायचा नाही तर शब्दाचा रंग सांगायचा आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता बरेच जण शब्दाचा रंग सांगायचा प्रयत्न करतात पण चॅलेंज पूर्ण करणं कुणालाच जमलेलं नाही. 100 टक्के लोक फेल झाले असंच म्हणावं लागेल.
इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चॅलेंजचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
तुम्ही हे चॅलेंज स्वीकारा आणि तुम्हाला जमतंय का पाहा आणि आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता ही बातमी इतरांना शेअर करून त्यांनासुद्धा हे चॅलेंज द्या. तसंच तुमच्याकडेसुद्धा असे काही चॅलेंज असतील तर तेसुद्धा आमच्यासोबत नक्की शेअर करा.