गिलियन बेडफोर्ड नावाच्या महिलेने आपल्या संसाराची ही कहाणी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिनं आणि तिच्या पतीनं लॉटरी जिंकली. लॉटरी कमी नाही तर तब्बल 15 अब्ज रुपयांहून अधिक किमतीची लॉटरी जिंकली होती. पण ही लॉटरी जिंकल्यानंतर हळूहळू त्याच्या आयुष्यातली सगळी नाती संपुष्टात आली. परिस्थिती अशी बनली की शेवटी त्यांचाही घटस्फोट झाला.
advertisement
Viral News - अजब प्रकरण! नवरा धावतो म्हणून बायकोने मागितला घटस्फोट
गिलियनने तिच्या माजी पतीसह 2012 मध्ये पंधरा अब्ज रुपयांहून अधिक किमतीची लॉटरी जिंकली. मात्र अवघ्या पंधरा महिन्यांतच दोघांचा घटस्फोट झाला. गिलियनने सांगितलं की, पतीपासून वेगळं झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनीही तिच्यासोबतचं नातं तोडलं. गिलियनने तिच्या जिंकलेल्या रकमेपैकी दोन अब्ज रुपयेही तिच्या कुटुंबाला दिले. पैसे घेतल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी गिलियनला एकटं सोडलं.
लॉटरीची कहाणी जगाला सांगताना गिलियनने शेअर केले की या पैशातून तिनं तिच्या कुटुंबाचे कर्ज फेडले. पण तिच्या आई-वडिलांनी पैशांसमोर मुलीच्या आनंदाकडे दुर्लक्ष केले. तिच्या वडिलांना गिलियनचा व्यवसाय घ्यायचा होता. जेव्हा गिलियनने हे केलं नाही तेव्हा तिच्या कुटुंबाने सर्व संबंध तोडले. मुलीने लॉटरी जिंकण्यापूर्वी तिचं कुटुंब एका कारवाँमध्ये राहत होते. तर नंतर त्यांनी घर, कार खरेदी केली. मात्र मुलीने पैसे देण्यास नकार दिल्यानें त्यांनी सर्व संबंध तोडले.
बायकोची बडबड थांबवण्यासाठी नवऱ्याने शोधला भन्नाट उपाय; सोशल मीडियावर झाला VIRAL
आता गिलियन पती आणि कुटुंबाशिवाय एकटीच राहते.