डिलिव्हरी बॉयला ऑर्डर द्यायला गेल्यावर घरासमोर स्विमिंग पूल दिसतो. मग काय त्याला पूलमध्ये जाण्याचा मोह आवरत नाही. तो ऑर्डर दिल्यावर लगेच स्विमिंग पूलकडे येतो आणि त्यामध्ये पोहायला लागतो.
VIDEO : मागून येणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ बनवत होता तरुण, बसली जबर धडक अन्....
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डिलिव्हरी बॉय घराचा पत्ता शोधत येतो. तो सुरुवातीला पत्ता बघत इकडे तिकडे जाताना दिसतो. नंतर पार्सल ठेवताच तो पूलाकडे येतो आणि पाण्यात सूर घेतो. हा व्हिडीओ @jimijamm नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
advertisement
42 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असून अनेक कमेंट व्हिडीओवर येत आहेत. व्हिडीओ शेअर करत युजरने लिहिलं की, एक अॅमेझॉन डिलिव्हरी बॉय कोणाच्यातरी पूलमध्ये पोहायला जातो, जेव्हा लॉस एंजेलिसजवळील गार्डना, कॅलिफोर्निया येथील एका घरमालकाला वाटलं की डिलिव्हरी बॉयला सरप्राईज द्यावं. घरमालकानं डिलिव्हरी बॉयसाठी चिठ्ठी सोडली होती. तेव्हा त्यानं घरामागील पूलाजवळ जात आपल्या हातातील सामान खाली ठेवलं आि लगेचच पूलमध्ये उडी घेतली. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
