एका महिलेनं फिटनेस चॅलेंज घेतलं होतं. या चॅलेंजची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे करत असलेल्या महिलेनं सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, बाहेरचे अन्न खाणं टाळणं, दारू सोडली आणि दररोज 10 मिनिटे पुस्तक वाचणं सुरु केलं होतं. या चॅलेंजमध्ये तिनं दररोज पाणी पिण्याचं प्रमाण वाढवलं. महिला हे चॅलेंज फॉलो करत असताना तिनं सलग 12 दिवस 4-4 लिटर पाणी पिलं, मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली.
advertisement
Viral News : मुलीने 3 दिवसात सोडली नोकरी, असं कारण दिलं की लोकही संतापले
मिशेल फेअरबर्न असं या महिलेचं नाव आहे. कॅनडात राहणारी मिशेल ही टिकटॉकर आहे. ती हे फिटनेस चॅलेंज आणि त्याची डेली अपडेट सोशल मीडियावर शेअर करायची. मात्र अधिक पाणी पिल्यामुळे तिची प्रकृती बिघडली. मात्र, बऱ्याच प्रयत्नांनंतर डॉक्टरांनी तिचे प्राण वाचवले. मिशेलला सोडियम डेफिशियन्सी नावाचा आजार झाल्याचं आढळून आलं. रोज 4 लिटर पाणी प्यायल्यानं हा आजार झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सोडियमची कमतरता हा एक धोकादायक आजार आहे, ज्यावर वेळीच उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकतो.
दरम्यान, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक धोकादायक असतो हे नेहमीच सांगितलं जातं. मग ती कोणतीही गोष्ट असो, कितीही आरोग्यदायी असो. निरनिराळी प्रकरणे सोशल मीडियावर समोर येत असतात.
