TRENDING:

Snake Fact: मेलेल्या सापावर पाय पडला तर? मृत सापापासून जीवाला धोका उद्भवतो का?

Last Updated:

ही गोष्ट खरंच आहे का? याचं वैज्ञानिक उत्तर सर्पमित्र मुरारी सिंह यांनी दिलं आहे. ते अनेक वर्षांपासून साप वाचवण्याचं आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याचं काम करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सापाचं नाव जरी काढलं तरी अनेक जण घाबरतात. कारण साप विषारी असतो आणि त्याचा दंश जीवघेणा ठरू शकतो. पण सापांबद्दल अनेक चुकीच्या समजुती समाजात पसरलेल्या आहेत. त्यातली एक म्हणजे "सापाच्या हाडांमध्येही विष असतं."
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

पण ही गोष्ट खरंच आहे का? याचं वैज्ञानिक उत्तर सर्पमित्र मुरारी सिंह यांनी दिलं आहे. ते अनेक वर्षांपासून साप वाचवण्याचं आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याचं काम करत आहेत.

सापाचं विष कुठे असतं?

मुरारी सिंह सांगतात की, सापाचं विष फक्त त्यांच्या डोक्याजवळ असणाऱ्या विषग्रंथींमध्ये (venom glands) असतं. जेव्हा साप कोणाला चावतो, तेव्हाच हे विष त्याच्या दातांद्वारे शरीरात जातं. त्यामुळे सापाच्या हाडांमध्ये किंवा मांसामध्ये कोणतंही विष नसतं.

advertisement

पण मग प्रश्न असा की मृत सापापासून धोका असतो का?

तर हो, जर साप मेला असला आणि त्याचे विषाचे दात (fangs) उघडे असतील किंवा अजूनही तिथे पडलेले असतील, तर सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

जर अपघाताने त्याच्यावर पाय पडला आणि विषदातामध्ये उरलेलं विष त्वचेच्या आत गेलं, तर धोका होऊ शकतो. त्यामुळे मृत सापालाही हात न लावलेला बरा.

advertisement

सर्पाचा दंश विषारी आणि विषरहित साप कसे ओळखाल?

जर फक्त दोन खोल दातांच्या खुणा दिसल्या असतील, तर साप विषारी असण्याची शक्यता जास्त. जर खूप लहान खवल्यांसारख्या ओरखड्या असतील, तर तो साप बहुधा विषरहित किंवा कमी विषारी असतो.

सापाचं मांस का खाल्लं जातं काही ठिकाणी?

भारताच्या काही भागांमध्ये, तसेच परदेशात, सापाचं मांस खाल्लं जातं. हेच सिद्ध करतं की सापाच्या मांसात किंवा हाडांमध्ये विष नसतं, म्हणूनच ते खाल्लं जातं. साप फक्त चावल्यावरच विष सोडतो. त्यामुळे सापाच्या हाडांमध्ये किंवा मांसामध्ये विष असतं, ही समजूत चुकीची आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Snake Fact: मेलेल्या सापावर पाय पडला तर? मृत सापापासून जीवाला धोका उद्भवतो का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल