एक 26 वर्षीय तरुण आहे ज्याने आत्तापर्यंत आपल्या सर्जरीवर 52 लाख रुपये खर्च केले आहेत. तो 19 वर्षाचा असल्यापासून आपल्या चेहऱ्यावर सर्जरी करतो. यामागे कारण सांगताना तो म्हणाला की, मी माझ्याच चेहऱ्यापासून लवकर बोअर होतो.
VIDEO : फोनवर बोलताना व्यक्तीनं अचानक उंच इमारतीवरून उडी मारली, अंगावर काटा आणणारं दृश्य
advertisement
हा 26 वर्षीय तरुण इंग्लंडमधील मँचेस्टर येथे राहतो. तरुणाचं नाव लेवी झेड मर्फी आहे. लेवीनं नाकाची, ओठ फुगवणे, तोंडाची चरबी काढणे, अशा वेगवेगळ्या सर्जरी केल्या आहेत. लेवीनं एकून 15 सर्जरी केल्या आहेत. सर्जरी करणं त्याला आवडतं. तो त्याचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.
लेवीनं नुकतीच एक सर्जरी केली. ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्याची स्थिती खूपच वाईट झाली. त्याचा चेहरा सुजला. त्याला डोळं उघडणही अवघड झालं. याविषयी बोलताना लेवीनं म्हटलं, मी अजून रिकव्हर होत आहे. मला भिती आहे की, यामुळे माझा चेहरा खराब होईल.
दरम्यान, अशा सर्जरी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र सर्जरी करणं बऱ्याचदा महागात पडतं. चांगला चेहरा अजूनच खराब होतो. लोक काहीह कारणावरुन सर्जरीच्या मागे लागतात. नंतर त्याचे भयानक परिणाम त्यांना भोगावे लागतात.
