एका व्यक्तीनं जुगाड करुन फोर व्हिलर बनवलीय, याचा व्हिडीओ सध्या इंटनेटवर जोरदार व्हायरल होतोय. आश्चर्याची बाब म्हणजे त्यानं खाटेपासून ही गाडी बनवलीय. पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही की, अशी पण गाडी बनवू शकतो. व्यक्तीचा हा जुगाड सध्या चांगलाच चर्चेत आलाय.
समोर आलेल्या जुगाडू व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पेट्रोल पंपवर लोक पेट्रोल भरण्यासाठी आपली गाडी घेऊन उभे असल्याचं दिसत आहे. तेवढ्यात एक खाटेपासून गाडी बनवलेला व्यक्ती तिथे पेट्रोल भरायला येतो. हे पाहूनच लोक थक्क होतात. झोपण्याच्या खाटेपासून या व्यक्तीनं चार चाकी गाडी बनवलीय. त्यानं बनवलेल्या या गाडीत पेट्रोल टाकण्याचीही सोय असून तो निवांत बसून गाडी चालवताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही भुवया उंचावल्या असतील.
advertisement
झोपण्याच्या खाटेपासून कोणी चार चाकी बनवेल असा विचारही कोणाला आला नसेल. मात्र या व्यक्तीनं चक्क गाडी बनवून दाखवली. त्याचा हा जुगाड पाहून सर्वच चकित झाले. dramebaazchhori99 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच व्हायरल झाला. लोक हा व्हिडीओ पाहून निरनिराळ्या कमेंट करत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर अनेक हटके जुगाडाचे व्हिडीओ समोर येत असतात. आपण विचारही केला नसेल अशा गोष्टी लोक जुगाड करत बनवतात. त्यामुळे जुगाडू लोक कधी कशापासून काय बनवतील काही सांगू शकत नाही. नेहमीच चकित करणारे जुगाडू लोकांचे व्हिडीओ समोर येत असतात.
