पण तुम्हाला माहितीय का की माणसाचा मेंदू वयाच्या किती वर्षापासून कमकुवत होऊ लागतो? हे ऐकायला थोडं विचित्र वाटत असेल पण हे खरं आहे.
वैज्ञानिक संशोधनानुसार, सामान्यतः 60 वर्षांनंतर माणसाचा मेंदू कमकुवत होऊ लागतो आणि हे बदल आपल्याला स्पष्टपणे जाणवायला लागतात. या बदलामागे काही नैसर्गिक प्रक्रिया जबाबदार असतात. वय वाढल्यावर मेंदूमधील न्यूरॉन्स म्हणजेच मेंदूतील पेशी नवीन माहितीची प्रक्रिया करण्यास आणि ती साठवून ठेवण्यास जास्त वेळ घेऊ लागतात.
advertisement
न्यूरोट्रांसमीटर्सचं प्रमाण कमी होतं, जे मेंदूच्या पेशींमध्ये सिग्नल पोहोचवण्याचं काम करतात. परिणामी, लक्ष केंद्रित करणे, नावं लक्षात ठेवणे किंवा जुनी माहिती लगेच आठवणे यासारख्या गोष्टींमध्ये अडचण येऊ लागते.
तथापि, हा एक नैसर्गिक बदल असला, तरी योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप आणि मानसिक व्यायाम (जसे की कोडी सोडवणे, वाचन, नवीन गोष्टी शिकणे) यामुळे मेंदूचं आरोग्य दीर्घकाळ चांगलं राहू शकतं.
काही लोकांमध्ये हे लक्षणं 60 च्या आधीही दिसू शकतात, तर काहीजण 70-80 पर्यंतही अत्यंत सक्रिय मानसिक क्षमता राखू शकतात. यात अनुवंशिकता, जीवनशैली आणि मानसिक तणाव यांचा मोठा वाटा असतो.