एका तरुणीनं 3 दिवसांत नोकरीला रामराम ठोकला. यामागचं कारण तिनं रेडिटवर पोस्ट करत शेअर केली. सी पोस्ट सध्या इंटरनेटंवर व्हायरल होत असून चर्चेत आली आहे.
माणसाप्रमाणे खास शैलीत गाडी चालवतोय प्राणी, VIDEO पाहून व्हाल थक्क
तरुणीनं सांगितलं की, बॉसने मला कोणतंही काम दिलं नाही आणि तरीही काम न केल्यावरुन फटकारलं. ती ऑफिसमध्ये काम पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ थांबत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. इतर ऑफिसमधील लोक मला काम द्यायचे ते मी पूर्ण करायचे. बॉसने मला विचारले की, तुला काही मानसिक आरोग्याशी संबंधित आजार आहे का? तेव्हा मी म्हणाले, मी यापूर्वी नैराश्याची औषधं घेत होते. पण आता ती ही औषधं घेतं नसून ती ठीक आहे. त्यानंतर बॉसनं तिला ही माहिती लपवल्याचा आरोप लावला.
advertisement
पुढे ती म्हणाली की, बॉसने वॉशरुममध्ये जास्त वेळ घालवत असल्याचा आरोपही लावला. जेव्हा तिनं समजून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा बॉसनं म्हटलं की तू वादग्रस्त व्यक्ती आहे. या सर्व प्रकारानंतर तरुणीनं तीन दिवसांतच राजीनामा दिला. ही पोस्ट व्हायरल होताच लोकांच्या अनेक कमेंट येत आहेत. अनेकांसोबत अशा घटना घडत असतात.
