TRENDING:

Snowfall Process: कशी होते बर्फवृष्टी, कधी विचार केलाय? काय सांगतं यामागील विज्ञान, घ्या जाणून

Last Updated:

पर्वतीय भागाची उंची समुद्रसपाटीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणांचं वातावरण वर्षभर थंड असते. हे वातावरण बर्फवृष्टीत महत्त्वाची भूमिका बजावतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वातावरणातल्या नैसर्गिक बदलांमुळे ऋतुचक्र घडतं. सध्या भारतामध्ये हिवाळा ऋतू सुरू आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या अनेक भागांत हिवाळ्यातली पहिली बर्फवृष्टी सुरू झाली आहे. या वर्षी बहुतेक भागांमध्ये बर्फवृष्टी होण्यास उशीर झाला आहे. काही भागांमध्ये मुसळधार हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशभरातले अनेक नागरिक या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी उत्तरेकडे निघाले आहेत. तुमच्यापैकी काही जणांनी कधी ना कधी बर्फवृष्टीचा आनंद घेतला असेल किंवा तशी इच्छा तरी असेल; पण आकाशातून बर्फवृष्टी कशी होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? 'झी न्यूज'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
Snowfall Process
Snowfall Process
advertisement

सूर्यकिरणांच्या उष्णतेमुळे समुद्र, महासागर, तलाव, नद्या, विहिरी आणि तलाव इत्यादी पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांतल्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवनानंतर तयार झालेली वाफ वातावरणातल्या हवेपेक्षा हलकी असते. त्यामुळे ती आकाशात उंच जाते. ही वाफ वातावरणाच्या वरच्या थरांमधल्या तापमानानुसार ढगाचं रूप धारण करते. हे तापमान गोठणबिंदूवर पोहोचलं असेल तर या वाफेचं रूपांतर बर्फात होतं. बर्फ तयार होताच तो जड होऊन खाली सरकू लागतो आणि या ढगांचा आकार बदलतो. जोरदार वाऱ्यामुळे त्यांचे तुकडे होऊ लागतात. हे छोटे बर्फाचे तुकडे एकमेकांवर आदळतात आणि जमिनीवर येतात.

advertisement

Viral News: बर्गरप्रेमींसाठी आनंदाची बातमी! 8 कोटी रूपये जिंकण्याची संधी; फक्त करायचंय हे छोटं काम

प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात बर्फवृष्टी का होते?

पर्वतीय भागाची उंची समुद्रसपाटीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणांचं वातावरण वर्षभर थंड असते. हे वातावरण बर्फवृष्टीत महत्त्वाची भूमिका बजावतं. कधीकधी मैदानी भागांतही गारांच्या स्वरूपात बर्फ पडतं. जमिनीवर येत असताना बर्फाचे तुकडे ओझोनच्या थरातून जातात. तिथल्या तापमानामुळे काही बर्फ वितळतो आणि गारांचा पाऊस पडतो. पर्वतीय भागातल्या थंड वातावरणामुळे फ्लेक्सच्या स्वरूपात बर्फ खाली पडतं.

advertisement

बर्फ तयार होण्यासाठी वातावरणातलं तापमान शून्य अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी असणं गरजेचं असतं. वैज्ञानिक भाषेत याला गोठणबिंदू म्हणतात. जमिनीचं तापमान गोठणबिंदूपर्यंत घसरलं किंवा त्यापेक्षा कमी झालं तर आकाशातून बर्फवृष्टी सुरू होते.

काही थंड प्रदेशांमध्ये बर्फ का पडत नाही?

जेव्हा जमिनीलगतच्या हवेचं तापमान -9 अंश सेल्सिअस किंवा त्याहून जास्त असतं तेव्हा जोरदार बर्फवृष्टी होते. कारण, थंड हवा जास्त वाफ धरू शकते. हिमवर्षावासाठी हवेमध्ये आर्द्रता असणं गरजेचं असतं. त्यामुळे काही भागांत थंडी असूनही आर्द्रतेच्या अभावी बर्फ पडत नाही. शुष्क थंडी असलेल्या प्रदेशात वाहणारे जोरदार वारे हवेतली थोडीफार आर्द्रतादेखील शोषून घेतात. त्यामुळे तिथे फारच कमी वर्फवृष्टी होते. अंटार्क्टिकातली शुष्क खोरी हे या खंडातलं सर्वांत मोठं बर्फमुक्त क्षेत्र आहे.

advertisement

इवल्याशा पक्षाने थांबवली प्रवाशांनी गच्च भरलेली ट्रेन; संपूर्ण प्रकरण जाणून चक्रावून जाल, पाहा VIDEO

आकाशातून पडणाऱ्या बर्फाचा रंग आणि आकार या गोष्टी सुरू असलेला ऋतू आणि प्रदेशावर अवलंबून असतो. बदलत्या हवामानाचा बर्फाच्या स्थितीवर परिणाम होतो. त्यामुळे काही ठिकाणी कापसासारखा पांढरा बर्फ पडतो, तर काही ठिकाणी पारदर्शक बर्फ पडतो. साधारणपणे बर्फ पांढऱ्याच रंगात पडतो. बहुतेकशा नैसर्गिक गोष्टी सूर्यप्रकाशातला काही भाग शोषून घेतात. त्यामुळे त्यांना रंग मिळतो; पण बर्फावर आदळणारा बहुतेक प्रकाश लगेच परावर्तित होतो. म्हणूनच बर्फ पांढरं दिसतं.

advertisement

धूळ आणि इतर गडद रंगाच्या कणांचा बर्फाच्या आकारावर आणि वितळण्याच्या गतीवर लक्षणीय परिणाम होतो. जर बर्फाचा रंग कणांमुळे गडद असेल तर तो जास्त सूर्यप्रकाश शोषून घेईल. काही संशोधनानुसार, हिमकणांच्या पृष्ठभागावर धूळ जमा झाली तर ती वितळण्यास 21 ते 51 दिवस लागू शकतात. तापमान दोन ते चार अंश सेल्सिअस असल्यास बर्फ 5 ते 18 दिवसांत वितळेल. बर्फाच्या पृष्ठभागाचं तापमान हवेच्या तापमानाद्वारे नियंत्रित केलं जातं.

मराठी बातम्या/Viral/
Snowfall Process: कशी होते बर्फवृष्टी, कधी विचार केलाय? काय सांगतं यामागील विज्ञान, घ्या जाणून
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल