इवल्याशा पक्षाने थांबवली प्रवाशांनी गच्च भरलेली ट्रेन; संपूर्ण प्रकरण जाणून चक्रावून जाल, पाहा VIDEO

Last Updated:

तुम्ही कधी ऐकलंय का की एका पक्षाने प्रवाशांनी भरलेली ट्रेन थांबवली आहे? हे तुम्हाला विचित्र वाटेल, पण अशी एक घटना आता समोर आली आहे

पक्षाने अडवली ट्रेन
पक्षाने अडवली ट्रेन
नवी दिल्ली : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की प्रवास करताना लोक चेन ओढून ट्रेन थांबवतातप. पण तुम्ही कधी ऐकलंय का की एका पक्षाने प्रवाशांनी भरलेली ट्रेन थांबवली आहे? हे तुम्हाला विचित्र वाटेल, पण अशी एक घटना आता समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओची चर्चा होत आहे. जो पाहून तुम्हीही चकित व्हाल.
प्रकरण लंडनच्या उपनगरातील बिशप स्टॉर्टफोर्ड स्टेशनचं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे उपस्थित असलेल्या एका हंसाने संपूर्ण रेल्वे मार्ग ठप्प केला. या मार्गावरून जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक हंस रुळावर मुक्तपणे फिरताना दिसल्याने ते अडकून पडल्याचं बोललं जात आहे. हंसाला रुळावर पाहून पायलटला ट्रेन थांबवणं भाग पडलं. त्यामुळे अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.
advertisement
View this post on Instagram

A post shared by RT (@rt)

advertisement
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेल्वे रुळावर ट्रेन उभी आहे, तिथे एक हंस पोहोचतो. ड्रायव्हर त्याला बाजूला करण्याचा खूप प्रयत्न करतो पण तरीही पक्षी हलत नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, या हंसाला कोणी उचलून एका बाजूला का हलवत नाही? तर, लंडनमध्ये हंसांबाबत एक कायदा आहे, चिन्हांकित हंस क्राउनची मालमत्ता मानली जाते. त्यामुळे त्यांना कोणी हात लावू शकत नाही. यावर फक्त क्राऊन प्रिन्सचा अधिकार आहे. रुळावरील हा हंस एक शाही हंस होता, म्हणूनच कोणीही त्याला हात लावला नाही.
मराठी बातम्या/Viral/
इवल्याशा पक्षाने थांबवली प्रवाशांनी गच्च भरलेली ट्रेन; संपूर्ण प्रकरण जाणून चक्रावून जाल, पाहा VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement