Kunickaa Sadanand : 'स्वतः आयुष्यभर तेच केलं...', कुनिका सदानंदवर भडकला कुमार सानूचा मुलगा, म्हणतो 'विवाहित पुरुषांशी...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bigg Boss 19 Kunickaa Sadanand : कुनिका सदानंदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती कास्टिंग काऊचसाठी मुलीच जबाबदार असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हणत आहे.
मुंबई : गेल्या काही एपिसोड्सपासून बिग बॉस १९ मध्ये फक्त एकच नाव गाजतंय, ते म्हणजे कुनिका सदानंद. प्रत्येक दिवशी कोणा ना कोणाशी तिचं भांडण होत असतं. नुकतंच तान्या मित्तलच्या संस्कारांवर आणि तिच्या आईच्या पालकत्वावर कुनिकाने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर संपूर्ण घर तिच्या विरोधात असल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, कुनिका बिग बॉसच्या घरात मुलींचे संस्कार आणि त्यांनी कसं असावं याबाबत तिची मतं मांडताना दिसते. अशातच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती कास्टिंग काऊचसाठी मुलीच जबाबदार असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हणत आहे. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींवर कोणतेही दुष्कर्म होत नाही, याउलट अभिनेत्रीच प्रोड्यूसर आणि डायरेक्टर्सना हिंट्स देतात. तिच्या या वक्तव्याने ती चांगलीच वादात अडकल्याचं पाहायला मिळतंय.
advertisement
हिरोईन्सच देतात हिंट्स
व्हायरल व्हिडिओमध्ये कुनिका सदानंद म्हणते की, “आपल्या इंडस्ट्रीमध्ये बलात्कार होत नाहीत. कुठे ना कुठे मुलींच्या बाजूनेही एक इशारा असतो.” तिने उदाहरण देऊन समजावलं की, जर एखादी अभिनेत्री दिग्दर्शकाकडे जाऊन विशिष्ट हावभावांमध्ये 'हाय सर, मला तुमच्यासोबत काम करायचं आहे' असं बोलली, तर हा एक प्रकारचा इशाराच असतो.
advertisement
कुनिकानी पुढे सांगितलं की, काही अभिनेत्री डोळे आणि हावभाव करून बोलतात, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला चुकीचा संदेश मिळतो. तिने म्हटलं की, ‘जर एखादी अभिनेत्री एखाद्या दिग्दर्शकाच्या परफ्यूमचं कौतुक करेल, तर तो तिला जवळ येऊन वास घ्यायला सांगेलच.’
advertisement
आयुष्यभर स्वतः हेच केलं…
कुनिकाच्या या वक्तव्यावर लोकांनी खूप संताप व्यक्त केला आहे. गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानू यानेही तिच्यावर जोरदार टीका केली आहे.

त्याने कुनिकाबद्दल एक कमेंट लिहली आहे, ज्यात त्याने म्हटलं की, “जिने आयुष्यभर हेच केलं. विवाहित पुरुष आणि ज्या कोणासोबत तिने संबंध ठेवले. जास्त तोंड उघडत नाही, नाहीतर खूप मोठी पोलखोल होईल.” कुनिका आणि कुमार सानू सहा वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते, जेव्हा कुमार सानू विवाहित होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Kunickaa Sadanand : 'स्वतः आयुष्यभर तेच केलं...', कुनिका सदानंदवर भडकला कुमार सानूचा मुलगा, म्हणतो 'विवाहित पुरुषांशी...'