प्रकरण अमेरिकेचं आहे. इथे राहणार्या अमेरिकन माणसानं जानेवारी 2023 मध्ये लॉटरी जिंकली आणि ही काही छोटी रक्कम नव्हती. ती 1.35 अब्ज डॉलर इतकी मोठी होती. त्या व्यक्तीला ही लॉटरीची बातमी सर्वांपासून लपवून ठेवायची होती. यामुळेच त्यानी याबाबत कोणालाच काही सांगितलं नाही. ही माहिती त्याने फक्त आपल्या पत्नीलाच दिली. पण लॉटरी जिंकल्यानंतर काही वेळातच त्याने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला
advertisement
पत्नीच्या ऑनलाईन शॉपिंगच्या सवयीला कंटाळला पती; वैतागून घेतला विचित्र निर्णय
कारण लॉटरी जिंकल्याचं पत्नीला सांगितल्यावर त्यांच्यामध्ये यादरम्यान एक अट होती, की पत्नी या लॉटरीबद्दल जून 2032 पर्यंत कोणालाही काहीही सांगणार नाही. परंतु त्याच्या पत्नीने ही माहिती गुप्त ठेवली नाही आणि घरामध्ये सांगितली. 8 फेब्रुवारी 2023 रोजी यासंबंधीचा करारही करण्यात आला होता आणि त्याअंतर्गत 1 जून 2032 पर्यंत या प्रकरणाचा कुठेही उल्लेख करायचा नव्हता. यामध्ये मुलीचं नाव देखील समाविष्ट करण्यात आलं होतं. कारण हप्त्यांमध्ये बक्षीस घेण्याऐवजी त्या व्यक्तीने $723,564,144 (करानंतर) एकाच वेळी घेतले. दोघे विभक्त होताच मुलाच्या वडिलांना आणि सावत्र आईला याची माहिती मिळाली आणि त्यानंतर ही बातमी त्यांच्या नातेवाईकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली.
बिझनेस इनसाइडरमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीने आपल्या पत्नीविरुद्ध करार मोडल्याबद्दल याचिका दाखल केली आहे. न्यायाधीशांसमोर ही वस्तुस्थिती उघड करण्यासाठी किमान $100,000 खर्च येईल. ही किंमत 80 लाख असेल.