पत्नीच्या ऑनलाईन शॉपिंगच्या सवयीला कंटाळला पती; वैतागून घेतला विचित्र निर्णय
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
तिला स्वयंपाक कसा करायचा किंवा कपडे कसे धुवायचे हे माहित नाही. पण त्या व्यक्तीची बायको एका गोष्टीत एक्सपर्ट आहे. ते म्हणजे ऑनलाइन शॉपिंग.
नवी दिल्ली 30 नोव्हेंबर : घरातील कामं करणं सोपं नाही. त्यातही घरातील काम फक्त एक जोडीदार करत असेल तर ते खूप कठीण होतं. पण नवरा बायकोनं ही सगळी कामं एकत्र मिळून केली तर ते सोपं होतं. एका व्यक्तीच्या कामचोर पत्नीची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलेचा पती पत्नीच्या ऑनलाइन शॉपिंगमुळे नाराज होता. शेवटी त्याने पत्नीला तिच्या आईवडिलांच्या घरी पाठवलं.
त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की त्याची पत्नी घरातील काम करत नाही. यामुळे तो नाराज होता. पत्नीच्या गैरवर्तणुकीमुळे त्यांचं घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या व्यक्तीचा आरोप आहे की, लग्नापूर्वी त्याला हे सांगण्यात आलं नव्हतं की त्याच्या पत्नीला घरातील कामं कशी करावी हे माहित नाही. तिला स्वयंपाक कसा करायचा किंवा कपडे कसे धुवायचे हे माहित नाही. पण त्या व्यक्तीची बायको एका गोष्टीत एक्सपर्ट आहे. ते म्हणजे ऑनलाइन शॉपिंग.
advertisement
त्या व्यक्तीने आपल्या अयशस्वी लग्नासाठी सासूलाही जबाबदार धरलं. त्या व्यक्तीने सांगितलं, की जर त्याच्या सासूने तिच्या मुलीला घरातील कामं करायला शिकवली असती तर आज तिचं आयुष्य थोडं वेगळं झालं असतं. मात्र या संपूर्ण प्रकरणात महिलेच्या आईचं म्हणणं वेगळंच आहे. तिने त्या व्यक्तीवर आरोप केला आणि म्हटलं, की त्याने कोणत्याही मोलकरणीशी लग्न केलं नाही. निदान त्याची बायको सुंदर तरी आहे. यावर त्याचं समाधान झालं पाहिजे. पतीने पत्नीला माहेरी परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 30, 2023 7:40 AM IST