शासकीय नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना या टिप्समुळे खूप फायदा होतो. यूपीएससीची तयारी करणारे अनेक विद्यार्थी आपण 18 ते 20 तासांपर्यंत अभ्यास केल्याचा दावा करतात. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खरंच किती तास अभ्यास करावा लागतो, यासह इतर काही प्रश्नांवर आयएएस अधिकारी अवनीश शरण यांचं मत जाणून घेऊ या.
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती तास अभ्यास करावा?
advertisement
प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगवेगळी असते. काही जण काही तास अभ्यास करून सर्व काही लक्षात ठेवतात, तर काहींना दहा ते बारा तास अभ्यास करूनही परीक्षेत अपयश येतं. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी एक्स या सोशल मीडिया साइटवर (पूर्वीचं ट्विटर) यू-ट्यूब व्लॉगचे दोन स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. त्यात 18 तास अभ्यासाचं नियोजन सांगितलं आहे. यावर शरण यांनी लिहिलं आहे, की अशा व्लॉगपासून दूर रहा. एवढा अभ्यास करायची गरज नाही.
आयएएस अवनीश शरण यांनी दिली अनेकांच्या प्रश्नांना उत्तरं
आयएएस अवनीश शरण यांनी अशी चुकीची माहिती देणाऱ्या व्लॉगपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसंच कमेंट बॉक्समध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंदेखील दिली आहेत.
1. सर, नेमका किती तास अभ्यास केला पाहिजे?
या पोस्टवर एका व्यक्तीनं हा प्रश्न विचारला आहे. त्यावर टॉप आयएएस अधिकारी शरण यांनी उत्तर दिलं आहे, की अभ्यास किती तास केला यामुळे काही फारसा फरक पडत नाही.
2.सीएपीएफची तयारी कशी करू?
दुसऱ्या एका युझरने सीएपीएफची तयारी करण्याबाबत मार्गदर्शन करावं असं म्हटलं आहे. त्यावर शरण यांनी सांगितलं, की एनसीईआरटीच्या पुस्तकांपासून अभ्यास सुरू करा. इयत्ता 12वीपर्यंतची सर्व पुस्तकं वाचा. चालू घडामोडींसाठी मॅगझिन वाचा.
3. तुम्ही यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी किती तास अभ्यास केला होता?
निखिल आर्या नावाच्या युझरने विचारलेल्या या प्रश्नावर शरण यांनी लिहिलं आहे, की 'मी दहा ते बारा तास अभ्यास करत होतो. कधी कधी तर 14 तासदेखील अभ्यास केला आहे.'
4. अभ्यास करताना मध्येच झोप आली तर काय करावं?
अभ्यासादरम्यान झोप येण्याची समस्या अनेकांना जाणवते. त्यावर शरण यांनी उत्तर दिलं, की अभ्यासादरम्यान थोडी विश्रांती घ्यावी. तुमचं शरीर म्हणजे एखादं यंत्र नाही.
5. अवनीश शरण यांनी शेअर केला परीक्षेच्या तयारीचा किस्सा
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी एका कमेंटला उत्तर देताना लिहिलं, की 'एकदा मी सलग 18 तास अभ्यास केला होता. त्यानंतर पुढचे 18 तास मी झोपून राहिलो.'