असंच काहीसं एका बँकेत पाहायला मिळालं, या बँकेने आता पुढच्या 3 वर्षात आपल्या 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण आहे AI.
बँकेची अनेक कामे आता AI द्वारे सहज करता येतात, त्यामुळे मानवी कर्मचाऱ्यांची गरज कमी होत आहे. याचा फटका प्रामुख्याने तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना बसणार आहे. मात्र, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील असे बँकेने म्हटले आहे. नवनवीन प्रकल्प पूर्ण झाल्यावर आणि कर्मचाऱ्यांचे करार संपुष्टात आल्यावर त्यांच्या जागी नवीन भरती केली जाणार नाही असेही बँकेने स्पष्ट केले आहे.
advertisement
ही सिंगापूरची सर्वात मोठी बँक DBS आहे. पुढील 3 वर्षात आपल्या 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा या बँकेनं निर्णय घेतला आहे.
DBS चे CEO पीयूष गुप्ता यांनी सांगितले की, एकीकडे काही नोकऱ्या कमी होत असल्या तरी दुसरीकडे AI क्षेत्रात नवीन संधी निर्माण होत आहेत. DBS येत्या काळात AI संबंधित 1,000 नवीन नोकऱ्या निर्माण करेल. हा बदल स्वीकारणारी DBS ही पहिलीच मोठी बँक ठरली आहे. मात्र, या निर्णयाचा सिंगापूरमध्ये नेमक्या किती नोकऱ्यांवर परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याच दरम्यान, AI च्या वाढत्या प्रभावामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने इशारा दिला आहे की, येत्या काळात AI मुळे जगभरातील 40% नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. IMF च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या की, 'AI मुळे आर्थिक असमानता वाढण्याची भीती आहे.