TRENDING:

Fact vs Myth : खरंच सापाच्या डोक्यावर मणी असतो का? नागमणीमागचं सत्य आणि मान्यता काय? चला जाणून घेऊ

Last Updated:

गरुड पुराण, शिव पुराण किंवा महाभारत यामध्ये नागमणीला चमत्कारी शक्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे लोकांच्या मनात या मण्याबद्दल एक विलक्षण आकर्षण आणि अंधश्रद्धा रुजलेली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय लोककथा, पुराणं आणि पौराणिक कथा यामध्ये एक रत्न किंवा एक नाव नेहमी ऐकायला मिळतं ते म्हणजे नागमणी. अनेक सिनेमांमध्ये देखील तुम्ही या नागमणीचा उल्लेख ऐकला असणार. इच्छाधारी नाग किंवा नागिणी यांच्या डोक्यावर हा मणी, जो त्या सर्पाला अद्वितीय शक्ती देतो, अमरत्व प्रदान करतो आणि त्याच्या साहाय्याने कोणताही विषप्रभाव निष्फळ होतो, याबद्दल अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे.
AI Generated photo
AI Generated photo
advertisement

हिंदू धर्मग्रंथांमध्येही नागमणीचा उल्लेख आहे. गरुड पुराण, शिव पुराण किंवा महाभारत यामध्ये नागमणीला चमत्कारी शक्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे लोकांच्या मनात या मण्याबद्दल एक विलक्षण आकर्षण आणि अंधश्रद्धा रुजलेली आहे.

सिनेमा आणि लोककथांचा प्रभाव

भारतीय चित्रपट, मालिकांमधून ‘नागमणी’ला एक जादुई रत्न म्हणून दाखवण्यात आलं. अनेकांना वाटू लागलं की जो या मण्याचा अधिपती बनेल, तो अमर आणि अपराजित ठरेल. अशा गोष्टींनी नागमणीची प्रतिमा अधिकच गूढ बनवली आहे. पण वास्तवात अशा मण्याचं अस्तित्व खरंच आहे का? असा प्रश्न उपस्थीत होतो.

advertisement

विज्ञान काय सांगतं?

शास्त्रज्ञ स्पष्टपणे सांगतात की कोणत्याही सापाच्या शरीरात मणी किंवा चमकणाऱ्या वस्तू नसतात. साप हे हाडं, त्वचा आणि मांसापासून बनलेले असतात. त्यांच्या डोक्यावर किंवा शरीरात कुठलाही रत्न तयार होत नाही. हे केवळ लोककथांमधून पसरलेलं एक काल्पनिक गूढ आहे.

मग आतापर्यंत लोकांना हा मणीकधी सापडला आहे का?

अनेकदा सापाने टाकलेल्या कातडीवर प्रकाश पडल्यावर ती क्रिस्टलसारखी चमकल्यासारखी जाणवते. यामुळे लोकांना वाटतं की त्यांना ‘नागमणी’ सापडली आहे. कधी सापाच्या पित्ताशयातील खडे किंवा कोरड्या सापाच्या युरेटसचा थरदेखील एखाद्या खडकासारखा वाटतो. हे सगळं पाहून अनेकदा गैरसमज निर्माण होतात की सापाने मणी टाकला आहे, वैगरे वैगरे

advertisement

‘नागमणी’ हा केवळ अंधश्रद्धेचा भाग आहे. त्याच्या मागे धावणं ही सापांसाठी प्राणघातक गोष्ट ठरते. साप हे जैवविविधतेसाठी खूप महत्त्वाचे जीव आहेत आणि त्यांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे.

...आणि ही सगळी चर्चा पुन्हा एकदा समोर आली, कारण बिहारच्या एका शाळेत एक पारदर्शक, चमकणारी वस्तू सापडली. काही जणांनी तिला ‘नागमणी’ समजून भीती आणि उत्सुकतेनं चर्चा सुरू केली. परंतु नंतर हे स्पष्ट झालं की ती केवळ प्लास्टिकसारखी सामान्य वस्तू होती. ना कोणता मणी, ना कोणता चमत्कार.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Fact vs Myth : खरंच सापाच्या डोक्यावर मणी असतो का? नागमणीमागचं सत्य आणि मान्यता काय? चला जाणून घेऊ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल