सूर्य आणि चंद्राच्या अत्यंत तपशीलवार आणि सुंदर प्रतिमा टिपण्यात प्रसिद्ध असलेल्या अँड्र्यू यांनी सांगितले की- हे त्यांच्या आवडत्या शॉट्सपैकी एक आहे. कारण यात एकाच वेळी दोन अद्भुत खगोलीय घटना एकत्र टिपल्या गेल्या – एक म्हणजे ISS चा सूर्याच्या समोरून होणारा ट्रांझिट आणि दुसरी – त्याच वेळी होणारी प्रबळ सौर ज्वाला.
advertisement
या छायाचित्राला अँड्र्यूने ‘Kardashev Dreams’ असे नाव दिले असून, ते सोवियत खगोलशास्त्रज्ञ निकोलाई कार्दाशेव यांना समर्पित आहे. त्यांनीच तो प्रसिद्ध “कार्दाशेव स्केल” तयार केला होता. जो एखादी सभ्यता तंत्रज्ञानाच्या पातळीवर किती प्रगत आहे हे मोजण्यासाठी वापरला जातो.
दुर्मिळ आणि थक्क करणारा क्षण!
हा फोटो अँड्र्यू मॅकार्थी यांनी 20 जून रोजी त्यांच्या इंस्टाग्राम (@cosmic_background) हँडलवर पोस्ट केली. त्यांनी लिहिले – ISS च्या ट्रांझिटची वाट पाहत होतो आणि अचानक एका सनस्पॉटमध्ये सोलर फ्लेअर फुटली… हा माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय शॉट ठरला! आतापर्यंतची माझी सर्वाधिक डिटेल्ड सोलर ट्रांझिट फोटो आहे ही… आणि ती दाखवते की आपल्या सर्वात प्रगत स्पेस टेक्नोलॉजीचीही सूर्याच्या तुलनेत काय किंमत आहे.
ही प्रतिमा टिपताना परिस्थिती सोपी नव्हती. अँड्र्यू यांनी सांगितले की, त्यावेळी बाहेरचे तापमान तब्बल १२१°F (सुमारे ४९.५°C) होते. इतक्या उष्णतेत टेलिस्कोप आणि संगणक ओव्हरहिटिंगपासून वाचवण्यासाठी त्यांनी आइस पॅक्स आणि थर्मोइलेक्ट्रिक कूलर चा वापर केला.
फोटो प्रचंड व्हायरल
हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेक युजर्सनी अँड्र्यू यांचं कौतुक केलं. एका युजरने लिहिलं – हे तर वेडपणाच्या पलीकडचं अप्रतिम आहे! दुसऱ्याने म्हटलं – या फोटोला नक्कीच एखादा पुरस्कार मिळायला हवा… वोटिंग कुठे करायचं?
एका तिसऱ्या युजरने लिहिलं – सामान्य माणूस हा फोटो पाहून ‘वा!’ म्हणेल… पण खरं म्हणजे यात किती मेहनत, वेळ आणि अचूक नियोजन आहे हे कळायला अनुभव लागतो. तुम्हाला सलाम!
एका युजरने विचारलं की – सूर्य आणि ISS हे तर करोडो किलोमीटर अंतरावर आहेत, मग त्यांच्यावर एकत्र फोकस कसा करता येतो? त्यावर अँड्र्यू यांनी उत्तर दिलं – अरबो नाही, करोडो… पण कॅमेऱ्यासाठी ते दोघंही ‘इन्फिनिटी’ म्हणजेच अनंत अंतरावरचं मानलं जातं. काही माईल्सनंतर डेप्थ ऑफ फील्डचा परिणाम राहत नाही.
अचूकतेची कसोटी
ISS पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर उंचीवर पृथ्वीभोवती फिरते आणि प्रत्येक 90 मिनिटांनी एक परिक्रमा पूर्ण करते. त्यामुळे ISS चा सूर्याच्या समोरून होणारा ट्रांझिट अवघ्या काही सेकंदांचा असतो. अशा संधीमध्ये अशा पर्फेक्ट आणि डिटेल्ड प्रतिमा टिपणं हे फोटोग्राफरच्या अचूकतेचं आणि कौशल्याचं जिवंत उदाहरण आहे. जे अँड्र्यू मॅकार्थी यांनी यशस्वीपणे दाखवून दिलं आहे.