TRENDING:

क्‍लर्कच्या एका चुकीमुळे करोडपती बनला व्यक्ती, रातोरात झाला 3.24 कोटीचा मालक

Last Updated:

एका स्टोअर क्लर्कच्या चुकीमुळे एका व्यक्तीला इतके पैसे मिळाले की तो क्षणात श्रीमंत झाला. एवढा पैसा मिळाला की त्याला संपूर्ण आयुष्य आरामात घालवता येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली 27 नोव्हेंबर : प्रत्येकाला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं असतं. पण कल्पना करा की एखाद्या व्यक्तीला त्याच्या कल्पनेपेक्षा जास्त पैसा मिळाला तर काय होईल? ही काही स्वप्नातली गोष्ट नाही, तर हे वास्तवात घडलं आहे. अमेरिकेत एका स्टोअर क्लर्कच्या चुकीमुळे एका व्यक्तीला इतके पैसे मिळाले की तो क्षणात श्रीमंत झाला. एवढा पैसा मिळाला की त्याला संपूर्ण आयुष्य आरामात घालवता येईल. लिपिकाच्या चुकीमुळे या व्यक्तीला लकी फॉर लाइफ तिकीट जॅकपॉट जिंकण्याची संधी मिळाली.
रातोरात करोडपती झाला व्यक्ती (प्रतिकात्मक फोटो)
रातोरात करोडपती झाला व्यक्ती (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील इलिनॉयस येथे राहणारे 60 वर्षीय मायकल यांनी हा जॅकपॉट जिंकला आहे. मिशिगन लॉटरीने दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, 17 सप्टेंबर रोजी झालेल्या लॉटरीत मायकल पाचही नंबर जुळवण्यात यशस्वी ठरले. न्यू बफेलो येथील 102 वेस्ट बफेलो स्ट्रीट येथील एका दुकानातून त्यांने हे तिकीट खरेदी केलं होतं.

शोधलं तर सापडतंच! पोलिसांनी आरोपीच्या पोटातूनही काढला पुरावा

advertisement

मायकल म्हणाला, मी जवळपास दर आठवड्याला मिशिगनला माझ्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो. मी जेव्हाही तिथे जायचो तेव्हा मी नेहमी जवळच्या दुकानातून 10 किंवा 20 ड्रॉसाठी लकी फॉर लाइफची तिकिटे खरेदी करत असे. यावेळी मी स्टोअर क्लार्कला 10 ड्रॉसाठी तिकीट मागितलं, परंतु त्याने चुकून एका सोडतीसाठी 10 लाईनचं तिकीट प्रिंट केलं. तो ते परत घेणार होता, पण ते पाहून मी म्हणालो - ठीक आहे, मला हे द्या. दरम्यान, ड्रॉ झाला आणि विजेत्याचा शोध सुरू झाला. मायकलला बरेच दिवस माहित नव्हतं. पण एके दिवशी सकाळी त्यांनी तिकीट तपासलं तेव्हा ते पाहून धक्काच बसला. लकी जॅकपॉट जिंकणारा तोच होता.

advertisement

या अंतर्गत त्यांना दरवर्षी 25 हजार डॉलर्स म्हणजेच 20.82 लाख मिळणार होते. मायकलला क्षणभर काहीच समजलं नाही. तो सुन्न झाला. मात्र त्याची खात्री पटल्यावर त्याने हे पैसे खर्च करण्याचं नियोजन सुरू केलं. लगेच लॉटरी कार्यालयात जाऊन दावा सादर केला. तिथे मायकलला ऑफर देण्यात आली की त्याला हवे असल्यास तो दरवर्षी $25,000 घेऊ शकतो किंवा $390,000 म्हणजेच 3.24 कोटी रुपये एकाच वेळी घेऊ शकतो. मायकलला सर्व पैसे एकाच वेळी घेणं योग्य वाटलं. कर भरल्यानंतर आता ते या पैशाचा योग्य उपयोग करण्याची योजना आखत आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
क्‍लर्कच्या एका चुकीमुळे करोडपती बनला व्यक्ती, रातोरात झाला 3.24 कोटीचा मालक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल