शोधलं तर सापडतंच! पोलिसांनी आरोपीच्या पोटातूनही काढला पुरावा
- Published by:Priya Lad
Last Updated:
आरोपींची हुशारी पोलिसांसमोर काही चालली नाही.
रांची, 26 नोव्हेंबर : चोरी, हत्या अशा प्रकरणांचा पोलीस तपास कसा घेतात हे तुम्ही सीरिअल, फिल्ममध्ये पाहिलंच असेल. कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते पोलिसांनापासून लपून राहत नाही. असंच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. ज्यात आरोपींनी पोलिसांपासून पुरावा लपवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी तो शोधून काढला. पोलिसांनी आरोपीच्या पोटातूनही पुरावा बाहेर काढला आहे.
झारखंडच्या जामताडा जिल्ह्यातील हे प्रकरण. इथं सायबर क्राईम भरपूर प्रमाणात होतं आहे. यात गिरडिह टॉपवर आहे. इथं गेल्या महिनाभरात 50 पेक्षा अधिक सायबर ठगांना अटक करण्यात आली आहे. ताज्या प्रकरणात 9 आरोपांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
माहितीनुसार सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांबाबत गिरिडीह पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वेगवेगळ्या भागात छापेमारी केली आणि अर्धा डझन आरोपींना अटक केलं आहे. त्यांच्याकडून 27 मोबाईल फोन आणि 32 सिम कार्ड जप्त करण्यात आलेत. एका अॅपमार्फत ते फसवणूक करत होते. कधी आरोग्य विभागाचे अधिकारी कधी वीज विभाग अधिकारी बनून नागरिकांचे ई-वॉलेट नंबर मिळवून त्यांच्या बँक खात्यातून पैसे उडवायचे.
advertisement
पोलीस कारवाईवेळी एका आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या मोबाईलचं सिम कार्ड गिळलं. यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन करून पोटातून सिमकार्ड बाहेर काढलं, असं वृत्त आज तकनं दिलं आहे.
Location :
Delhi
First Published :
November 26, 2023 8:14 PM IST