कुत्रा चावल्याचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही हे व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे. कारण यात एक माणूस कुत्र्याला चावतो आहे.
Snake Facts : साप विषारी की बिनविषारी कसं ओळखायचं? त्याला पाहताच कसं समजेल?
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक कुत्रा जमिनीवर आहे. एका तरुणाने त्याला घट्ट पकडलं आहे. तरुण त्याच्या तोंडाला चावतो आहे. कुत्रा जिवाच्या आकांताने ओरडतो आहे. तरुणाने त्याला इतकं घट्ट पकडलं आहे की त्याला त्याच्या तावडीतून सुटताही येत नाही आहे.
advertisement
व्हिडीओच्या शेवटी एक व्यक्ती त्या तरुणाला खेचते. त्यावेळी त्या कुत्र्याची त्या तरुणाच्या तावडीतून सुटका होते. तो तिथून पळत सुटतो.
व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. viral_ka_tadka या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.