लग्नाच्या रात्री झोपून दुसऱ्या दिवशी उठलेल्या नवऱ्याने जे पाहिलं त्याच्या पाया खालची जमीनच सरकली. त्याने रडत रडत आईला हाक मारायला सुरुवात केली. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
पिझ्झा जास्त विकला गेला आणि युद्ध झालं, इराण-इस्राइल वॉरशी याचा काय संबंध?
काय आहे प्रकरण?
रियाणातील रेवाडी गावातील हा प्रकार 'लग्न' या पवित्र बंधनाच्या नावाखाली घडलेली एक फसवणूक. रात्रभर नवविवाहित जोडीने एकमेकांसोबत वेळ घालवला, पण सकाळ झाली तेव्हा वधू बेपत्ता होती. तिच्यासोबत घरातील सगळे दागदागिने आणि रोकडही गायब होती. या घटनेनंतर नवरदेव थेट रडत आईकडे धावला आणि म्हणाला, "आई, ती बेडरूममध्ये नाहीय!"
advertisement
दरम्यान, जलदीप नावाच्या व्यक्तीसोबत ही घटना घडली. या धक्कादायक प्रकारानंतर त्याच्या वडिलांनी नी रेवाडीच्या बावल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस अधिकारी एसआय सुरेंद्र यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वधू आणि आरोपी मध्यस्थांचा शोध घेतला जात आहे. पीडितेने दिलेल्या पत्त्यावरही पोलिस छापा टाकतील.