लग्न होताच एक कपल मोठ्या कडावरुन खाली उडी घेतं. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या लग्नाला आलेल्या पाहुणे मंडळींकडूनही ही साहसी गोष्टी करुन घेतली. लग्नात आलेल्या लोकांनाही त्यांनी कडावरुन उड्या मारायला लावल्या. हा धाडसी स्टंट करतानाचा व्हिडीओही समोर आलाय.
Viral News: सॅंडविच आणि कोल्ड्रिंक आयुष्यभर मिळणार फ्री, फक्त हे काम करावं लागेल
advertisement
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्न होताच कपल उंच कड्यावरुन हवेत उडी मारण्याचा स्टंट करत आहे. या स्टंटला स्कायडायव्हिंग म्हणतात. कपल लग्न होताच हा स्टंट करताना दिसत आहे. याशिवाय लग्नात आलेल्या पाहुण्यांनाही हा स्टंट करायला भाग पाडतात. असा विवाह कधीच कोणी विसरणार नाही. नवरा बायको आणि लग्नाला आलेले बाराती सर्वच या स्कायडायव्हिंगची मजा घेताना दिसत आहे.
हा साहसी स्टंट करुन चर्चेत आलेल्या कपलचं नाव प्रिसिला अॅंट आणि फिलिपो लेकर्स आहे. त्यांनी लग्न होतात स्कायडायव्हिंग स्टंट केला. हा व्हिडीओ पाहिल्यावर हृदयाचा ठोका चुकल्याशिवार राहणार नाही. हा धोकादायक स्टंट सध्या चर्चेत आला असून प्रिसिला आणि फिलिपोचा विवाहदेखील चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, लग्नातील, लग्नानंतरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, भावुक व्हिडीओ समोर येत असतात. मात्र प्रिसिला आणि फिलिपोनं जे केलं ते क्वचितच कपल करतात.
