Viral News: सॅंडविच आणि कोल्ड्रिंक आयुष्यभर मिळणार फ्री, फक्त हे काम करावं लागेल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जगभरातील अनेक लोक फूडी आहेत. वेगवेगळे पदार्थ ट्राय करणं हे अनेकांना आवडतं. खास करुन फास्ट फूड. लहानांपासून मोठ्यांपर्यंत बरेच लोक फास्ट फूड खातात.
नवी दिल्ली, 30 जुलै : जगभरातील अनेक लोक फूडी आहेत. वेगवेगळे पदार्थ ट्राय करणं हे अनेकांना आवडतं. खास करुन फास्ट फूड. लहानांपासून मोठ्यांपर्यंत बरेच लोक फास्ट फूड खातात. यामध्ये पिझ्झा, बर्गर, सॅंडविच, पास्ता, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मात्र यापैकी एक गोष्ट जर तुम्हाला आयुष्यभर फ्री खायला मिळाली तर? या विचारानेच तोंडाला पाणी सुटतं. तुम्ही वाचलेली ही गोष्ट खरी असून एका रेस्टॉरंटने अशी ऑफर काढली आहे. जर तुम्ही त्यांच्या अटी मानल्या तर तुम्हाला आयुष्यभरासाठी सॅंडविच फ्री खायला मिळेल.
फास्ट फूड रेस्टॉरंट फ्रँचायझी "सबवे" ने खास अटींवर एक उत्तम ऑफर दिली आहे. कंपनीचं नाव बदलण्यासाठी एक स्पर्धा ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धकांना फक्त SubwayNameChange.com जायचंय आणि 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान या वेबसाईटवर लॉगईन करायचंय.
advertisement
या स्पर्धेत फक्त सहभाग घेण्यासाठी वय 18 च्या पुढे असावं. ही स्पर्धा फक्त अमेरिकेसाठी मर्यादित आहे. विशेष म्हणजे, नाव बदलण्यासाठी कंपनी विजेत्याला $750 कायदेशीर शुल्क देईल. विजेत्याला $50,000 म्हणजेच 41,13, 000 रु. किमतीची सबवे गिफ्ट कार्ड्स मिळतील ज्याचा वापर आयुष्यभर करु शकता. जिंकलेली व्यक्ती आयुष्यभर सॅंडविच आणि कोल्ड्रिंग्स घेऊन जाऊ शकते.
advertisement
जो कोणी स्वतःचं नाव बदलून 'सबवे' ठेवेल त्याला कंपनी ही ऑफर देणार आहे. यासाठी कंपनीनं पुरावाही पाहिल. पुराव्यासाठी नाव बदलणाऱ्या व्यक्तीकडे चार महिन्यांचा कालावधी आहे. जो कोणी अधिकृतपणे आपलं नाव सबवे ठेवेल याचा पुरावा कंपनी चेक करेल आणि ही ऑफर त्याला देईल. म्हणजेच आयुष्यभर सॅंडविच कोल्डिंग फ्री मिळवण्यासाठी लोकांना आपलं नाव बदलावं लागेल.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 30, 2023 12:41 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral News: सॅंडविच आणि कोल्ड्रिंक आयुष्यभर मिळणार फ्री, फक्त हे काम करावं लागेल








