जंगलातील सर्व प्राण्यांमध्ये सिंह-सिंहिणीचाच दरार असतो, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक सिंहीण बिबट्याच्या बछड्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होती, पण तिथं त्यांची आई असल्यानं तिनं हे संकट आपल्यावर घेत पिलांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. पिलांना दुखापत होऊ नये यासाठी मादी बिबट्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अचाट धैर्य दाखवलं. या व्हिडिओची सुरुवात एका मादी बिबट्यापासून होते, जी आपल्या पिलांसह झाडाझुडपांमध्ये लपलेली दिसते. प्रत्यक्षात ती लपून एका सिंहिणीवर लक्ष ठेवून होती, जेणेकरून तिच्या पिलांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, पण नेमकं नको तेच घडलं.
advertisement
सिंहिण अचानक कुठूनतरी समोर आली आणि बिबट्याशी भिडली, शक्ती कमी असतानाही मादी बिबट्या मागे हटली नाही. ती आपल्या पिलांना वाचवण्यासाठी सिंहिणीशी निकराने लढली आणि नंतर तिचे लक्ष भरकटवून तिला दुसरीकडे घेऊन गेली, जेणेकरून तिची पिले सुरक्षित राहतील.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर @AMAZlNGNATURE नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मादी बिबट्या आपल्या पिलांना सिंहिणीपासून वाचवताना’.
26 सेकंदांचा छोटासा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाखाहून जास्त वेळा पाहिला गेलाय, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि विविध कमेंटही केल्यात. एका युजरने लिहिलंय, ‘दोघांच्या आकारात खूप फरक आहे, पण ती आपल्या पिलांना वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढेल’. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना नक्कीची आईची माया समजेल. पिलांवर संकट आलं तर आई अंगात हत्तीचं बळ आल्यासारखं ती लढू शकते, याचाच प्रत्यय देणारा हा व्हिडिओ आहे.
