नाग-नागिणींच्या प्रेमाविषयी तर तुम्ही ऐकलंच असेल मात्र त्यांच्या भांडणाविषयी ऐकलंय किंवा पाहिलंय का? एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये नाग-नागिण एकमेकांसोबत भांडण करत असून एकदम तीव्रपणे फाईट करत आहेत. त्यांच्या भांडणाचा हा भयानक व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल आणि अंगावर काटा येईल.
घरात घुसला आणि कोंबडीला जबड्यात पकडून नेलं, बिबट्याचा थरारक VIDEO
advertisement
नाग-नागिणच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातील असं दिसतं की, नाग नागिण एकमेकांवर प्रेम करत आहे. अचानक दोघांनाही राग येतो आणि प्रेम भांडणात रुपांतरीत होतं. गोल फिरून गळा दाबून ते एकमेकांशी लढाई करत आहे. त्यांचं स्पीड आणि ही लढाई पाहून कोणीही घाबरेल. दोघेही एकमेकांवर फना काढून हल्ला करत आहे.
d_shrestha10 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नाग नागिणीची अशी लढाई तुम्ही क्वचितच पाहिली असेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेक कमेंट पहायला मिळाल्या.
