घरात घुसला आणि कोंबडीला जबड्यात पकडून नेलं, बिबट्याचा थरारक VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आजकाल वन्य प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी भीती बसलीय. दिवसा-रात्री कधीही त्यांची दहशत पसरली असून त्यांच्या हल्ल्याच्या भीतीनं लोक घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवत आहेत.
मुंबई: आजकाल वन्य प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी भीती बसलीय. दिवसा-रात्री कधीही त्यांची दहशत पसरली असून त्यांच्या हल्ल्याच्या भीतीनं लोक घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवत आहेत. अशातच यामध्ये आणखी भर पडली असून एक बिबट्या घरात घुसून कोंबडी उचलून नेतो. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ उडवतोय.
भायंदरमधून ही घटना समोर आलीय. शिकारीच्या शोधात एक बिबट्या भायंदर पश्चिम येथील केशव सृष्टी कॉम्प्लेक्सजवळ पोहोचला. बिबट्यानं एका घरात घुसून कोंबडीला आपलं शिकार बनवलं. तिला जबड्यात पकडून घेऊन गेला. हा सीसीटीव्ही व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
advertisement
बिबट्या दबक्या पावलांनी येऊन हळूच शिकार उचलून जातो. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बिबट्या येतो आणि शिकारीसाठी शोधाशोध करतोय. तेवढ्यात त्याला कोंबडी दिसते आणि तो तिच्यावप हल्ला करतो. कोंबडीला जबड्यात पकडून तो तिला घेऊन जातो. हा सर्व घटनाक्रम घराच्या व्हरांड्यात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.
घरात घुसला आणि कोंबडीला जबड्यात पकडून नेलं, बिबट्याचा भायंदरमधील थरारक VIDEO#news18marathi pic.twitter.com/OYQDsWwzTY
— News18Lokmat (@News18lokmat) April 23, 2024
advertisement
या घटनेविषयी बोलताना घरमालकानं सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून या बिबट्यानं अनेक कोंबड्या आणि कुत्र्यांना आपली शिकार बनवलं आहे. त्यामुळे या बिबट्याला जेलबंद करण्यात यावं.
दरम्यान, अशा वन्य प्राण्यांच्या हल्ल्याची घटना यापूर्वी समोर आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्राण्यांच्या दहशतीच्या घटना घडतात. त्यामुळे लोकांच्या मनात भीती बसलीय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 23, 2024 10:03 AM IST










