त्या गावातील प्रत्येक घरात खुलेआम साप फिरत असतात. दरम्यान इतर ठिकाणी आपल्या घरात साप आलेल पाहून लोक घाबरतात, पंरतु या गावात लोक सापांचे स्वागत करतात आणि तेही किंग कोब्रा! याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. या गावात नाग प्रत्येक घरात मोकळेपणाने फिरत असून त्यांना कोणीही अडवत नाही.
अजब प्रथा! इथे लग्नानंतर 3 दिवस नवरी-नवरदेवाला टॉयलेटला जाण्यास मनाई, कारण हैराण करणारं
advertisement
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या 2018 च्या रिपोर्टनुसार, या गावातील 2600 हून अधिक ग्रामस्थ नागाची पूजा करतात. इथं माणूस ना सापांना इजा करतात ना साप माणसांना इजा पोहोचवतात. दोघेही एकमेकांसोबत राहतात, एकमेकांना घाबरत नाहीत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, येथे माणसाला साप चावल्याची एकही घटना घडलेली नाही. इथल्या घरांव्यतिरिक्त शाळेच्या वर्गातही साप येतात, पण मुले सापांमध्येच वाढलेली असल्याने त्यांना अजिबात भीती वाटत नाही. येथे आपले नवीन घर बांधणारे लोक सापांसाठी एक छोटा कोपरा बनवतात ज्याला देवस्थानम असे नाव दिले जाते.
ज्या घरात साप येऊन बसतात त्या प्रत्येक घरात हा कोपरा असतो. सापांसोबत राहण्याची ही प्रथा कधी आणि कशी सुरू झाली हे कोणालाच माहीत नाही, पण आता सापही इथल्या लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. इथे बाहेरचा माणूस आला तर त्याला भीती वाटणे साहजिक आहे. अशा स्थितीत अंडी, दूध आणि नशीब सोबत आणावे, असा सल्ला येथील लोकांनी दिला आहे.