अजब प्रथा! इथे लग्नानंतर 3 दिवस नवरी-नवरदेवाला टॉयलेटला जाण्यास मनाई, कारण हैराण करणारं
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
इथे लग्नानंतर तीन दिवस नवविवाहित जोडप्याला खोलीतच बंद केलं जातं. इतकंच नाही तर 3 दिवस त्यांना टॉयलेट वापरण्यासही परवानगी नसते
नवी दिल्ली : लग्न हा नवरी आणि नवरदेवाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि खास दिवस असतो. लग्नानंतर दोघंही एका नव्या आयुष्याला एकसोबत सुरूवात करतात. मात्र, प्रत्येक भागानुसार, राज्यानुसार आणि देशानुसार लग्नातील प्रथा, परंपरा बदलत असतात. काही ठिकाणच्या प्रथा इतक्या अजब आणि विचित्र असतात, की त्या सगळ्यांनाच हैराण करतात
आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणच्या प्रथेबद्दल सांगणार आहोत. ज्याबद्दल ऐकून तुम्ही चक्रावून जाल. इंडोनेशिया आणि मलेशियामधील टिडॉन्ग जमातीच्या लोकांमध्ये एक अतिशय अजब प्रथा आहे. इथे लग्नानंतर तीन दिवस नवविवाहित जोडप्याला खोलीतच बंद केलं जातं
advertisement
इतकंच नाही तर 3 दिवस त्यांना टॉयलेट वापरण्यासही परवानगी नसते. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी रूमच्या बाहेर काही लोकही ठेवले जातात. जेणेकरून ते रात्री उशिरा लपूनही टॉयलेटचा वापर करू शकणार नाही. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे, की लग्नाचं नातं हे त्याग आणि कष्टाने जोडलं जातं. जर तीन दिवस कपलने त्याग आणि हा त्रास सहन केला तर त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदात जाईल, असं मानलं जातं
advertisement
3 दिवस पती-पत्नीला खाण्यासाठीही अगदी कमी अन्न दिलं जातं. जर कपलने हे चॅलेंज पूर्ण केलं तर ते घरच्या लोकांसोबत पार्टी करतात. या प्रथेबद्दल ऐकून तुम्हालाही अजब वाटलं असेल मात्र इंडोनेशिया आणि मलेशियामधील टिडॉन्ग जमातीचे लोक हे सगळं प्रत्यक्षात करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 09, 2024 10:20 AM IST
मराठी बातम्या/Viral/
अजब प्रथा! इथे लग्नानंतर 3 दिवस नवरी-नवरदेवाला टॉयलेटला जाण्यास मनाई, कारण हैराण करणारं