'होणारी बायको सरकारी नोकरी करते', सांगत पठ्ठ्याने वाटल्या लग्नपत्रिका; फेऱ्यांआधी पोलिसांनी ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
सोशल मीडियावर ओळख झालेल्या या कपलचं लग्न 26 जुलै रोजी होणार होतं. पण या लग्नाआधी पोलिसांनी कारवाई केली आहे. हे अजब प्रकरण चर्चेत आलं आहे.
पाटणा : आपल्याला सरकारी नोकरी करणारा जोडीदार मिळावा अशी इच्छा कित्येकांची असते. फक्त महिलांनाच सरकारी नोकरी करणारा नवरा हवा असं नाही तर पुरुषांनाही सरकारी नोकरी करणारी बायको हवी असते. अशीच बायको एका व्यक्तीला मिळाली. त्यामुळे मोठ्या तोऱ्यात आपली बायको सरकारी नोकरी करते, असं सांगत या व्यक्तीने लग्नपत्रिका वाटल्या आणि लग्नाआधीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बिहारमधील हे अजब प्रकरण आहे.
पाटणामध्ये राहणारा रवी रंजन. फेसबुकवर त्याची जान्हवी सिंग नावाच्या तरुणीशी ओळख झाली. जान्हवीने आपण दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टर असल्याचं सांगितलं. आपण हार्ट सर्जन आहोत असं तिनं सांगितलं. तसंच पहिल्याच प्रयत्नान यूपीएससी पास केल्याचं ती म्हणाली. आता इतकी शिकलेली मुलगी म्हटल्यावर कुणीही तिच्या प्रेमात पडेल. रवीचंही तेच झालं. तो तिच्या प्रेमात पडला. जून 2024 मध्ये तो तिला भेटण्यासाठी दिल्लीला पोहोचला.
advertisement
जान्हवीने रवीला घातली लग्नासाठी मागणी
रवी जेव्हा जान्हवीला भेटायला दिल्लीला गेला तेव्हा जान्हवीनेच रवीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. सरकारी नोकरी करणारी बायको मिळते म्हणून रवीनंही लग्नाला होकार दिला. तो जान्हवीसोबत पाटण्याला आला. जिथं 15 जुलैला त्यांचा साखरपुडा झाला. यानंतर 26 जुलै रोजी एका खाजगी कार्यक्रमात त्यांचं लग्न होणार होतं. यावेळी जान्हवी रवीच्या घरी थांबली होती.
advertisement
जान्हवीचा रवीच्या कुटुंबावर आरोप
रवीच्या घरी राहत असलेल्या जान्हवीनं सोबत बरेच दागिने आणले होते. तिनं रवीच्या नातेवाईकांवर 30 लाखांचे दागिने चोरल्याचा आरोप केला. लग्नापूर्वी तिनं बेऊर पोलिसात तक्रार दाखल केली. इथंच तिची चूक झाली. ती स्वतःच फसली. पोलिसांना जान्हवीवर वेगळाच संशय आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता वेगळंच सत्य समोर आलं.
advertisement
जान्हवीचं धक्कादायक सत्य
जान्हवीच्या कागदपत्रांची तपासणी केली असता तिचे सर्व कागदपत्र बनावट असल्याचे आढळून आले. जान्हवीकडून पोलिसांना दोन आधार कार्ड, बनावट एम्स ओळखपत्र, रोख रक्कम आणि काही बनावट सोन्याचे दागिने सापडले. यानंतर पोलिसांनी जान्हवीला अटक केली. चोरीच्या बनावट दागिन्यांच्या बदल्यात रवीकडून बनवलेले खरे दागिने मिळवण्याचा तिचा प्लॅन होता, असं चौकशीत उघड झालं. यानंतर ती सर्व रोकड आणि दागिने घेऊन पळून जाणार होती. पण त्याआधीच पोलिसांनी तिला अटक केली.
Location :
Bihar
First Published :
August 09, 2024 9:54 AM IST
मराठी बातम्या/Viral/
'होणारी बायको सरकारी नोकरी करते', सांगत पठ्ठ्याने वाटल्या लग्नपत्रिका; फेऱ्यांआधी पोलिसांनी ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?