बंद शाळेतून येत होता आवाज, गेट उघडून पाहताच सगळेच हादरले; असं होतं काय?

Last Updated:

शाळा बंद होती पण आतून आवाज येत होता. मुलाच्या रडण्याचा आवाज. एका महिलेनं शाळा प्रशासनाला आणि ग्रामस्थांना माहिती दिली. शाळेचा दरवाजा उघडताच त्यांना धक्का बसला

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
मुझफ्फरनगर : एका प्राथमिक शाळेत खळबळ उडाली आहे. ही शाळा बंद असताना त्यातून आवाज येत होता. अखेर शिक्षकांनी गेट उघडून पाहिलं. आत जे दृश्य पाहून त्यामुळे सगळ्यांना धक्का बसला. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील ही घटना आहे. ही घटना चर्चेत आली आहे. यानंतर असं समजलं की शाळेच्या शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे.
मुलांच्या शाळेत येण्याजाण्याचा वेळा ठरलेल्या असतात. काही वेळा काही कारणामुळे फार फार तर 5-10 मिनिटं उशीर होईल. पण यूपीच्या मुझफ्फरनगरमधील सरकारी शाळेत शिकणाऱ्या एक 6 वर्षांचा मुलगा मात्र बराच वेळ झाला आणि तो घरीच आला नाही. संपूर्ण शाळा बंद झाली. तासभर गेला. तरी मुलगा घरी न आल्याने आईलासुद्धा चिंता वाटू लागली. म्हणून ती त्याला शोधायला घराबाहेर पडली.
advertisement
शाळेतून मुलाच्या रडण्याचा आवाज
मुलाच्या आईनं इतर विद्यार्थ्यांना आपल्या मुलाबाबत विचारलं. त्यांनी आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं. अखेर मुलाला शोधत शोधत आई शाळेपर्यंत पोहोचली. शाळा बंद होती पण आतून आवाज येत होता. मुलाच्या रडण्याचा आवाज. याबाबत तिनं शाळा प्रशासनाला आणि ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक तिथं आले. शाळेच्या शिक्षिका रविता राणी यांचे पती चावी घेऊन शाळेत पोहोचले आणि त्यांनी दरवाजा उघडला. त्यांना धक्काच बसला. महिलेच्या मुलगा बंद शाळेत होता. त्याचाच रडण्याचा आवाज शाळेतून येत होता.
advertisement
मुलाला शाळेत कोंडल्याचा आईचा आरोप
मुलाला शाळेत कोंडून ठेवल्याचा आरोप आईने केला आहे.  मुलगा शाळेत झोपला असावा, असं शिक्षिका रविता राणी यांच्या पतीनं सांगितलं. पोलिसांनी सांगितलं की, सरकारी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिलीचा विद्यार्थिनी जनसाठ इसाके हा वर्गात बंद अवस्थेत आढळून आल्याची घटना मंगळवारी घडली. मुख्याध्यापिका संध्या जैन आणि वर्ग शिक्षिका रविता राणी यांच्या कथित निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. याप्रकरणी मुलाच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. ज्यामध्ये तिनं दोन्ही शिक्षक दलित मुलांचा द्वेष करत असल्यामुळे त्यांच्या मुलाला शौचालय साफ करण्यास भाग पाडल्याचं सांगितलं.
advertisement
मुख्याध्यापक, शिक्षकावर कारवाई
याप्रकरणी प्राथमिक शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापिका आणि एका शिक्षकावर कारवाई केली आहे. जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी संदीप कुमार यांनी सांगितलं की, मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आलं आहे. शिक्षिका रविता राणी यांच्या सेवापुस्तकात विपरित नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दोन सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना शाळा बंद करण्यापूर्वी वर्गखोल्या तपासण्यास सांगण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
बंद शाळेतून येत होता आवाज, गेट उघडून पाहताच सगळेच हादरले; असं होतं काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement