घरातून गायब झाली मुलगी, पोलिसांनी शोधून काढलं; तरी झाले निलंबित, पण का?

Last Updated:

मुलगी न सांगता घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला आणि नंतर पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी तिला शोधून काढलं.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
लखनऊ : बेपत्ता झाल्याच्या बऱ्याच तक्रारी पोलीस ठाण्यात येतात. असंच एक प्रकरण. एक मुलगी घरातून बेपत्ता झाली. कुटुंबायांनी तिचा शोध घेतला पण ती काही सापडली नाही. अखेर त्यांनी पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तब्बल सहा महिने मुलीचा शोध घेतला. सहा महिन्यांनंतर ती पोलिसांना सापडली. पण यानंतर पोलिसांना मात्र निलंबित करण्यात आलं.
उत्तर प्रदेशच्या मथुरामधील हे प्रकरण आहे. एक मुलगी न सांगता घरातून बेपत्ता झाली होती. त्याच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला आणि नंतर पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला. तिचं अपहरण झालं होतं. तिची सुटका करण्यात आली.
कुठे होती मुलगी?
सुमारे सहा महिन्यांपूर्वी हायवे पोलीस स्टेशन हद्दीतील एका तरुणाने राया पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील एका मुलीला फूस लावली होती. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी 26 जुलै रोजी मुलीला ताब्यात घेतलं होतं. मात्र तिची प्रकृती खालावल्याने तिला पोलिसांच्या देखरेखीखाली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
advertisement
रुग्णालयातून पळाली मुलगी
पण यानंतर ती मुलगी दुसऱ्याच दिवशी रुग्णालयातन पळून गेली. मुलीने पोलिसांना चकमा देत तिनं पळ काढला.  त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली.  निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. एक पोलीस स्टेशन अधिकारी आणि एका महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं आहे.  पोलीस सूत्रांनी सांगितलं की, वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेश कुमार पांडे यांनी राया पोलीस स्टेशनच्या अनोरा पोलीस चौकीचे प्रभारी निरीक्षक विजय सिंह यादव आणि लेडी कॉन्स्टेबल पूनम यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून निलंबित केलं आहे. आता मुलीचा शोध सुरू आहे.
advertisement
बालिकागृहातून अचानक 26 मुली गायब
याआधी मध्य प्रदेशच्या भोपाळमधील एका खासगी एनजीओच्या वसतिगृहातून मुली गायब झाल्यानंतर मोठा वाद सुरू झाला. बालिकागृहातून 26 मुली अचानक गायब झाल्या होत्या. या मुली गुजरात, राजस्थान, झारखंडसह मध्य प्रदेशातील सीहोर, रायसेन, छिंदवाडा आणि बालाघाट परिसरातील रहिवासी होत्या.
advertisement
भोपाळच्या परवालिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे अनधिकृत बालिकागृह चालवलं जात होतं. विनापरवानगी बालिकागृह चालवल्या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला. या प्रकाराबाबत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी मध्य प्रदेशचे मुख्य सचिव वीरा राणा यांना पत्र लिहिलं होतं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
घरातून गायब झाली मुलगी, पोलिसांनी शोधून काढलं; तरी झाले निलंबित, पण का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement